Selections from the Peshwa Daftar 27.216: [10-4-1758] Mahipat Lakshman Panse reports to the Peshwa the condition of affairs near Bhopal whither he had gone for the purpose of collecting supplies.
Selections from the Peshwa Daftar 27.216
- Language
- Marathi
27.216
पौ छ ३ सवाल
श्री
सेवेसी विनंती. सेवक महिपतराव लक्ष्मण कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना. येथील वर्तमान ता॥ छ ३ सवाल मु॥ बारखेडे नजीक भूपाल येथे यथास्थित असे. यानंतर छ २९ रमजानचे आज्ञापत्र सादर जाले; तेथे आज्ञा जे भूपालवाल्याच्या तालुक्यांत फौज आहे, त्यासी रानांत दाणादुणा आहे, तो आणावयाचा तो आणिताच आहांत. परंतु गावखेडियास उपद्रव होऊ नये, गुरू ढोर आणू नये गांव नासू नयेत, निक्षूण ताकीद करावी, म्हणोन पत्री आज्ञा; त्यास आज्ञेप्रमाणे लोकास ताकीद केली आहे. सिवारातीलच दाणा वैरण आणितात, गांव खेडी तमाम उज्याड आहेत. कोन्ही जाळणार नाहीत. आज्ञेप्रमाणे वर्तणूक होईल. भूपालवाल्याचे वकील येथे होते त्यास हुजूर कारभार पटला, यास्तव आजी छ मजकुरी उठोन गेले. आम्ही फौजसुधा येथे कितेक दिवस आसावे. हुजूर यावयाची आज्ञा जाली तर हुजूर येऊ; नाहीं तर आरते-परते दाहावीस कोस तळ ढाकले (?) जाऊ, येविषयीची आज्ञा करणार स्वामी समर्थ आहेत. स्वारीत रुपया काही मिळाला नाही. बिलंदखानास आठा हजारांची वरात दिल्ही आहे. नित्य खर्चावीण हैराण आहेत. येथें तो पैसा मिळत नाहीं. छुटीवर मजकूर आहे. दुसरे गारदी आहेत त्यासहि पोटास नाही. आज्ञा होईल तर हुजूर सेवेसी पाठवीन. दरमाहाकरी सिलेदार आहेत त्यासहि रोजमरा द्यावा लागतो. चांदरात आली. येविशी आज्ञा करणार स्वामी समर्थ आहेत. सेवेसीं श्रुत होय हे विज्ञापना.
3714