Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 27.217: [11-4-1758] Mahipatrao Lakshman Panse reports his transactions at Bhopal.

Selections from the Peshwa Daftar 27.217

Language
Marathi

27.217

श्री

सेवेसी विनंती. सेवक महिपतराव लक्ष्मण कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना. येथील वर्तमान ता॥ छ ४ सवाल भानुवासर त्रितीये प्रहर मु॥ हणमती नजीक देवीपुरा येथे यथास्थित असे. यानंतर अजी छ मजकुरी आज्ञापत्र सादर जाले, तेथे आज्ञा जे भूपालवाल्यांची मामलत जाली. इतक्यावर त्याच्या मुलकास उपसर्ग द्यावयासी कामास न ये. तुम्ही फौजसुधा उठोन लस्करात येणे म्हणोन आज्ञा. त्याजवरून पत्र येताच कूच आठा कोसाचे करून राजश्री विठ्ठल सिवदेव याचे कारकुनानी मार्ग दाखविला, त्या मार्गे मुकाम मजकुरास येऊन दाखल जालो. उदईक लस्करात येऊ. अजीच येत होतो. परंतु मजल लांब पडली; यास्तव येथे मुकाम केला. सेवेसी श्रुत होय. उदईक लस्करचे कूच होणार किंवा मुकाम होणार येविसीची आज्ञा सेवकास जाली पाहिजे हे विज्ञापना.