Selections from the Peshwa Daftar 27.218: [21-4-1758] Hari Raghunath Bhide sends Nana Fadnis a detailed report of the activities of Raghunathrao in the Punjab. After advancing upon Sirhind he defeated Abdul Samadkhan and appointed Adinabeg to the district. He then proceeded to Lahore where he was met by the Abdali's forces under his son Taimurshah and
Selections from the Peshwa Daftar 27.218
- Language
- Marathi
27.218
पै॥ छ १८ रमजान
श्रीरामचंद्र
श्रीमंत राजश्री नाना स्वामीचे सेवेसी
सेवक हरि रघुनाथ भिडे कृतानेक सां॥ नमस्कार विनती उपरी. येथील कुशल ता॥ चैत्र शुध १३ मु॥ लाहोर नदी येरावती तीरी अनंदरूप जाणून स्वकीये स्वानंदलेखनाज्ञा करीत गेले पाहिजे. यानंतर दोन च्यार पत्रे पूर्वी सेवसी पाठविली परंतु येकहि न आले. याजकरिता चित सापेक्षित असे. तरी यैसे न करिता सदैव अलिया माणसाबा कृपापत्री सांभाल करीत असावे विशेष. श्रीमंत साहेबी आबदूल संमदखान सरहदेंत होता त्याचे पारपत्य करून मुलूक प्रा॥ मजकूर व दुवब दोन्ही तालुके आदिनाबेग मोगल याजकड खंडणी ठराऊन त्याचे स्वाधीन केले. तदुतर मजल दरमजल ज्याहानखान आबदालीचे पुत्रासहवर्तमान लाहूरी बिसा हजारा फौजनसी होता त्याजकड चालिले. तेव्हा विपाशा नदीतिरीहून सव्या फौजा मानाजी पायगुडे व गंगाधर बाजीराव व गोपाळराव गणेश पुढे खाना केले. यासी त्याणी येऊन मारनेलेसी गाठ घातली तेव्हा तो घाबरा होऊन आपले बुणगे व तोफखाना वगैरे कितीक फौज मागे टाकून सडा ती चौ हजाराफौजेनसी चिनाव नदीपार उतरोन जीव रक्षणमुळे पळाला. आपले फौजेने नदीपर्यंत पाठिलाग करून सर्व फौज तोफखा(ना)देखील लुटिला. पुढे चिनाव पार व्हावे तरी नदीस (पाणी) फार. उपाये नाही म्हणून राहिले नाही; तरी तोहि लुटला जाता. भगवंते रक्षिला. येरवी श्रीमंत साहेबाचा प्रताप इकडे बहुत विस्तार पावला. त्याचा विस्तार ल्याहावासा नाही. ज्याहानखान व तयैमूरशा सलाबतीनेच पळाले. इतकियाने या प्रांती वर्तमान हिंदुस्थान रजवाड व दिली व जाट वगैरे याजवरी सलाबत भारी पडली. दक्षण फौंज पहिले दिलीआलाकड आली नव्हती ते चिनाव नदीपर्यंत पोहचली. चिनाविस पाणी थोडे असते तरी आटकपर्यंत जाती. सहात (?) मात्र आट(क) पार होऊन गेली. पुढे पूल बांधोन फौजा जाव्या त्यास आटकाय भारी पडेल मग छावणीस मूळ जाले. छावणी दूरदेसी करता न ये. त्याहीवरी लोक कष्टी होतात. येसे आसोन ।। सहसा विदधीत न क्रिया ।। म्हणौन लाहूर प्रांतीचा बंदोबस्त करून श्रीमंत साहेब देशोदेशी माघारे फिरतीलसे दिसते. याहीवरी भगवतसत्ता प्रमाण. जाले वर्तमान सेवेसी लिहील. होईल ते लेहून पाठऊ. बहुत काय लिहिणे ? कृपा लोभाची वृद्धि कीजे हे विनती.
[१ पैवस्ती नाना फडणिसाच्या हातची. यावरून पत्र नाना फडणिसास.]
राजश्री लक्षुमणपंत कुंटे व माहादाजीपंत खरे यासी नमस्कार. कृपा कीजि हे विनती.
राजश्री नारोपंत दिवेकर व लक्ष्मणपंत देसमूख व पाडुरगपंत कापसे यासी नमस्कार. कृपा आसो दीजे हे विनती. पांडुरगपंत कापसे कोठे आहे ते लिहून पाठविले पाा हे विनती.
राजश्री हरीपंत फडके व नारोपंत यासी नमस्कार. समस्त इष्टमित्रास नमस्कार सांगणे हे विनंती.
श्रीमंत राजश्री विश्वासराव साहेबाचे पत्र स्वामींनी प्रविष्ट केले पाहिजे हे विनती.
3716
Discussed in (1)
- Fall of the Mughal Empire — Sarkar 1932, English