Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 27.219: [24-4-1758] Raja Keshavrao and his son Badrinath send congratulations to the Peshwa on the splendid achievements of his forces in the North.

Selections from the Peshwa Daftar 27.219

Language
Marathi

27.219

श्रीकृष्णौजयेतो

श्रीमंत माहाराज धर्मधुरंधर

राजश्री बालाजीराव नाना

स्वामी पंडितप्रधान गोसावी

यांचे सेवेसी

स्नेहांकित राजा केशवराव व राव बदरीनाथराऊ कृतानेक नमस्कार विनती उपरी. येथील क्षेम ता॥ छ १५ साबान मुकाम झासी जाणून स्वकुशल लेखनआज्ञा केली पाहिजे विशेष. आम्ही दिलीस आबदालीचा उपसर्ग जालियता आपले धर्मसंरक्षणार्थ सकुतुंब तो दुष्ट येतांच निघोन आलो. मथुरा आगरियावरून नीट झांसी माहाराजांचे राज्य तेथे येऊन राहिलो. माहाराजाहीहि सर्व साहित्य करून आज्ञापत्रे आमचे विषई सर्वास पाठविली त्याजवरून संपूर्ण येक वरीसपरियंत पितापुत्र दोन्ही अग्निहोत्रिकवरून सकुतुंब कालक्षेप केला व माहाराजाचे प्रतापवृधिचाच आसीर्वादपूर्वक निजध्यास होता त्याप्रमाणेच दक्षणउतर सर्वत्र दिग्विजये माहाराजाचा पाहिला व मनोरथ पूर्ण जाले. झासीत राहून तीर्थे बहुत केली. श्रीप्रयागी माघस्नान संपूर्ण जाले. ब्रह्मावर्ता आदीकरून सर्व तीर्थे जाली व माहाराजास वरच्यावरी विनतीपत्रेहि बहुत पाठविली व सर्व वर्तमान लिहिले; परंतु माहाराजास वरचेवरीहि वर्तमान कलतच आहे. तथापि आमचें काम आम्ही करावें. आम्हास पूर्ण कलोन चुकले आहे जे, माहाराजाचा अमल काबूल कंधारवरी व्हावा व समुद्रवलयांकित पृथिवीचे राज्य माहाराजास व्हावे. येवनाचा आपकर्ष जाल हे हिंदुमात्रास भूषण जाले. आम्ही तो माहाराजाचे पदरचे त्रिपुरुषापासून आहोत. अमचा निर्वाह किती असेल राहिले आमचेविषई कोण्ही स्मरण देयास माहाराजाचे दरबारी कोण्ही दिसत नाही. स्वतः महाराज करतील तितकेंच होईल. सर्वज्ञाप्रति विशेष किती लिहावे ? पत्रोतर कृपापूर्वक लिहावयास आज्ञा करावी हे विनती. श्रीमंत दादासाहेबापासून सदैव पत्रोत्तरे पावताती. बहुतच लोभ करिताती हे विनंती.

Bk Ca 11-28