Selections from the Peshwa Daftar 27.220: [May 1758] Antaji Mankeshwar while communicating the news of Raghoba's success at Sirhind remonstrates against the spirit of insubordination lately shown by Vithal Shivdev. Under the instigation of Malharrao Holkar, Vithal Shivdev remained encamped at Sikandra in violation of the orders to proceed to Patna and
Selections from the Peshwa Daftar 27.220
- Language
- Marathi
27.220
श्री
पु॥ श्रीमंत राजश्री भाऊसाहेब
स्वामींचे सेवेसी
विज्ञापना यैसीजे श्रीमंत राजश्री दादासाहेब सरंदेस गेले. तेथे शहरास मोर्चे लाऊन हल्ला करून शहर घेतले. आबदालीकडील सरदार संमतखान व चंगबाजखान वगैरे सरंदेत होते त्यासी जखमा लागल्या आहेत. त्यासी धरून आणिले आहे. वस्त्रे भूषणे देऊन आपल्यापासी ठेविले आहेत. श्रीमंताची फते जाली. सरंद शहर लुटून घेतले. पुढे लाहोरियास जहानखान आहे पलोन जाईल. त्याच्यानेहि श्रीमंतापुढे टिकाव धरवत नाही. संतोषाचे वर्तमान स्वामीस कळावे म्हणून सेवसी लि॥ असे. वजीर श्रीमंतासी फारसा येकलास राखितात आणि बहुतच खुशी आहेत. तैसेच श्रीमंतहि स्नेह करितात. राा विठल सिवदेव यासी श्रीमंतांनी पटणियासी रवाना केले आहेत. त्यासी त्यानी आपल्या मार्गे जावे ते दिल्लीस येऊन सिकंदरियावर मुकाम केले आहेत आणि शहरच्या बाहेर लूट मांडली आहे. पातशाहाचा पुत्र सिकारीस बाहेर गेला होता त्यासी धरून आपल्या लस्करात नेले आहे. याजमुळे वजिरानी श्रीमंतास लिहिलें आहे. श्रीमंतानीहि वाईट मानिले. त्यासी विठल सिवदेव यांसी कांहीं म्हणावे तर त्याजला राा सुभेदार यांची पाठ आहे. याजकरिता श्रीमंतानी गोष्ट चित्तात ठेविली, त्यामुळे वजीर श्रमी बहुत आहेत. श्रीमंतासी व वजिरासी स्नेह फार आहे. श्रीमंतासी जीवप्राणे भाऊपणा केला याजमुळे त्याची आदावत सुभेदार व विठळपंत करितात. म्हणतात जे आमचा पक्ष सोडून तिकडील पक्ष कां धरिला? याजमुळे आदावत करितात. श्रीमंत वजिरासी बहुत स्नेह राखितात. वजिराची पत्रे स्वामीस आहेत. स्वामीनीहि त्याची उतरे बहुत प्रकारे संतोषाची पाठवावी. त्यामधे सेवकाची मालुमात फारसी ल्याहावी. त्याच्या पत्राची नकल मसुदा सेवकास पाठवावा. मजकूर कळला पाहिजे. वजिराचे आज्ञेत राहाणे म्हणून पत्रे सुरजमल जाटास व माधोसिंगास लिहून आम्हाजवळ पाठवावी. सरंदेची फौज दाहा हजार आबदालीची श्रीमंतानी बुडविली. आता लाहोरातील दाहा हजार जहानखान आहे तो पलोन जाईल आथवा मारिला जाईल. हिंदुस्थानचा सूड आबदालीचा श्रीमंतानी घेतला.
3718 सेवेसी श्रुत होये. विठल सिवदेव याचे बुध्दीस फारच फेर पडला आहे हे विज्ञापना.