Selections from the Peshwa Daftar 27.221: [15-5-1758] Krishnarao Ballal (Kale, later the Peshwa's agent at the Nizam's Court) informs Dadasaheb that Jankoji Sindia is encamped near Kota and is expected to move towards Jainagar.
Selections from the Peshwa Daftar 27.221
- Language
- Marathi
27.221
पा छ १७ रमजान
श्रीमंत राजश्री दादासाहेब स्वामीचे
शेवेसी
विनंती सेवक कृष्णराव बलाल सा नमस्कार विज्ञापना. येथील वर्तमान ता॥ वैशाख सुध ८ सोमवार सेवकाचे वर्तमान यथास्थित असे विशेष. केसोबा व धर्माजीपंत गुदस्ता जैनगरचे तलावसून रो दत्ताजी सिंदे याजकडे गेले होते ते येथे आठ दिवस आले आहेत. सोबतीमुळे राहिले आहेत. राा जनकोजी सिंदे फौजेसवर्तमान कोथ्यानजीक आहे. (आठा) चऊ दिसा जैनगर प्रांतीं येतील यैसी खबर दिलीत आहे. मागून सविस्तर लिहून पाठऊ. शाहानवाजखां दौलताबादेवर होता. सलाबतजंग याजपासी फिरंगी होते त्यांसी शाहानवाजखान यासी स्नेह, याजकरितां किला पाहावयासी गेले तेथे दगा करून शाहानवाजखान धरिला आणि किला घेतला यैसी खबर सराफी औरंगाबादेहून आली आहे. बंगाल्याहून फिरंगी आले होते ते पुणियास श्रीमंत नाना साहेबाकडे गेले. हे विज्ञापना.