Selections from the Peshwa Daftar 27.222: [25-5-1758] The sudden advance of Najibkhan towards Delhi and measures designed to intercept him are communicated to Dadasaheb at Lahore.
Selections from the Peshwa Daftar 27.222
- Language
- Marathi
27.222
छ १७ रमजान
पुरवणी श्रीमंत दादासाहेब
स्वामींचे शेवेसी
विज्ञापना. नजीबखान येकायेकीच दरकूच बुढाणियापावतो दिलीहून तिसा कोसावर आला आणि शोखीच्या गोष्टी सांगू लागला. यांत अर्थ आसा आडला
[+ पत्र अंताजी माणकेश्वराचें.]
3719 की इशारतीखेरीज नाही आला. प्रस्तुत रो विठ्ठलराव याणी वजिरासी करार केले त्यावरून बाहादरखां बलोच व सैद जमिलुद्दीखान वगैरे रिसालदार सर्व मिलोन नजीबखानावर जावयाचा करार ठरला आहे. पांच सांत दिवस निघायास लागतील. इतकियांत नजीबखान माघारा जातो की काय हे कलल अगर मामलियत पेशजी जाहाली आहे त्याप्रो कबूल करील हे विज्ञापना.