Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 27.223: [25-5-1758] An incomplete letter to Dadasaheb stating that Najibkhan is highly incensed against Holkar and Vithal Shivdev who were chiefly instrumental in ousting him from Delhi.

Selections from the Peshwa Daftar 27.223

Language
Marathi

27.223

छ १७ रमजान

श्री

पुरवणी श्रीमंत राजश्री दादासा-

हेब स्वामीचे शेवेसी

विज्ञापना. आम्ही दिलीस पावतांच पांच साता दिसां रा विठ्ठलपंत याजकडे गेलो. बंगाल्याची मामलियत व शाहाजाद्याचे बोलीची घालमेल होत होती. त्यासमईं त्रिंबकपंत वकिलांकडील कारभारांत होते. त्यासमईं ते विठ्ठलपंत यासी बोले कीं सुभेदारावर तुम्हावर नजीबखानाचा आभिश्राप आला आहे कीं नजीबखानास दिलीहून तुम्ही उभयेतानी काढून दिले. याजकरितां प्रस्तुत नजीबखानाने शोखी केली आहे याजकरितां जरंद येतात ते कागद देऊन कोणीकडे जातात हें कलत नाहीं तेव्हा आजूर करून पाठवावा लागतो. चौदा (अपूर्ण)