Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 27.224: [27-5-1758] Vithal Shivdev writes to Sakharam Bapu at Lahore that he is being detained in the capital owing to some financial affairs. The Vazir has offered him a jagir of five lakhs in return for his help in occupying Najibkhan's districts.

Selections from the Peshwa Daftar 27.224

Language
Marathi

27.224

छ १९ रमजा(न)

श्री

राजश्रिया विराजित राजमान्ये

राजश्री सखारामपंत बापू

स्वामीचे सेवेसी

पो विठल सिवदेव कृतानेक नमस्कार विनंती उपर येथील कुशल जाणून स्वकीये लिहीत गेले पाहिजे विशेष. आपल्याकडील पत्र बहुत दिवस येत नाही

[१. यापुढील बराच मजकूर गहाळ असावा. आतां सुरू होत असलेला मजकूर पत्राच्या पाठीवरील होय.]

3720 तर सदैव पत्र पाठऊन परामर्ष करीत जावा. इकडील वर्तमान तर सविस्तर श्रीमंताच्या पत्री लिहिले आहे ते पत्र पाहून त्याप्रमाणे निरोत्तर उत्तरे पाठवावी. सदैव पत्रद्वारे परामृष करावा हे उचित असे. लाहोराकडे यावे तो दिलीवाल्यासी गाठ. आद्यापवर पुरता नर्गम नाही. शाहाजाद्याची त्याची समजावीस करून दिल्ही. आलादा हवेलीत हजार प्यादा, पाचाशा स्वारानसी राहिला. जागरीत आमील पाठविले. जागरीत लाऊन देत होतो, परंतु याच्याने आमच्या फौजेसी वाटे न जाये कीं जमीदार भारी हर कोठे फजीत पावला तर आब्रू जाईल. त्याचा त्यानेच निकाल काढला की तुम्ही याल तर जागरीत जाईन, नाहीतर हजार स्वार देणे; नाहीतर निखालस समजावीस करून देणे. आम्हास दोन्ही गोष्टी आनकूल नाहीत, सबब समजावीस करून दिल्ही. वजिराने नागरमल्लास मध्यस्ते देऊन इमानप्रमाण देऊन हवेलीत राहिला. आम्ही देशास गेल्यावर मग काये होणे ते हो; परंतु आम्ही तो आपलेहि काम केले. त्याचे ठीक करून सात लक्ष रुपये मुदतीचे येणे. आम्ही राहिलो छावणीस तर वसुलात आणू. देशास गेलो तर खावंद वसूल ज्यास सांगतील ते करतील. तूर्त नजीबखानाचा मनसबा वजिराने योजिला आहे. दिलेलसिंगाने मामलत सुभेदाराचे आमच्या गुजरतीने केली होती ते राहिली. आमचा तनखा दिल्हा होता तो त्याने न मानला सबब बिघडली. वजीर आम्हास व अंताजीपंतास देखील घेऊन जाणार. आम्हास पांचा लक्षाची जागीर देईन म्हणतो. मुलूक सोडवा. सात तेहि वसूल करून द्यावे हेहि दोन चौ पैकी घ्यावे रबीचे बाकीपैकी. आम्हासहि तुम्हाकडे त्याच मार्गे येणे. तोहि बुढाण्यावर आहे. पाहावे. दिलीची फौज निघणे कठीण. निघाली तर उत्तम. नाहीतर दोचा निकाल सरून येऊ. मुधोजी भोसले याचा विचार ल्याहावा. बहुत काय लिहिणे हे विनंती.