Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 27.225: [May 1758?] Dadasaheb is informed that Najibkhan refuses to pay tribute due from him. The Vazir in consequence has kept in confinement his Diwan Megharaj and his brother.

Selections from the Peshwa Daftar 27.225

Language
Marathi

27.225

[seal: श्री]

पुरवणी श्रीमंत राजश्री दादासाहेब

स्वामीचे शेवेसी

विज्ञापना. बाबूराव हरी व आयतोले यांचा मजकूर विस्तारे लिहिला आणि रां। अंताजीपंत यासहि लिहिला होता. आम्ही आपले पत्र आज्ञेप्रा। दाखविले त्यावरून मारनिलेनी सर्व गोष्टी धन्याच्या मर्जीप्रा। मान्य केल्या. येवजाची

3721 वाट करून घेणे म्हणून आज्ञा. त्यासी मारनिलborderेनी मान्य केले. येवजहि देतील. खासी स्वारी माघारी कुरुक्षेत्रास आली म्हणजे भेटीसहि येतील. यानंतर नजिबखानाची मामलियत पूर्वी सुभेदारांनी व रो विठ्ठलपंत याणी केली होती. त्या येवजी चऊ लक्षाच्या हुंड्या मध्ये राजाने आणिल्या होत्या. आलीकडे नजीबखान बुढाणियास आला. त्यासमई * * * * * (ब)दलून गोष्टी सांगू लागला की मी शो देत नाही. तुम्ही नजीबखानाचे पारपत्य करा, तो मला लिहितो की रु॥ देऊ नको. त्यावरून बदमामलीसा ठहरला याजकरिता वजिराने मेघराज व त्याचा भाऊ कैद सिलीमगढात केला आहे. बेआबरू नाही केली. उगाच कैद करून चौकी मात्र आहे. नजिबखानाचे काय होते ते पाबोन जे करणे ते करितील. बहुत काये लिहिणे ? लोभ केला पाहिजे हे विज्ञापना.