Selections from the Peshwa Daftar 27.226: [May 1758?] Krishnarao Ballal (Kale) writes to Raghoba that the atmosphere at Delhi is charged with suspicion.
Selections from the Peshwa Daftar 27.226
- Language
- Marathi
27.226
[seal: श्री]
सेवेसी कृष्णराव बल्लाळ सा नमस्कार विज्ञापना. सुरजमल जाठ दिलीपासून पंचविसा कोसावर मेरत्यांत आहे. मुलकाचा बंदोबस्त करितो. फौज च्यार पांच हजार आहे. त्याचा लेक जवाहरमल सुरजमलासी बिघडला आहे. त्याचे आनुसंधान येका ग्रहस्ताचे विद्यमाने आम्हाकडे आले आहे. आम्ही त्यासी लाऊन ठेविले आहे. जर त्याप्रांते स्वामीच्या छावणिया जाहाल्या तर गरीबसा वकील घेऊन येऊ. जर स्वामी इकडे आले तर उतमच जाहाले. सुरजमलाचे आणि नागरमळ याचे चित येक आहे. खानखाना किल्यांत कैदेत वजिराचे आहे. बेड्या मात्र नाहीत. प्रतिष्ठेने आहेत. कारण जाठाकडे नजिबखानाकडे काही सूत्राचे कागद पाठवीत होते. आबदूल आह्यादखान याजलाहि आभिप्राय आला होता ; परंतु ते कैदेपासून वाचले परंतु आपले घरी बसले आहेत. वजिराचे सारे येथे दुशमन आहेत. स्वामीच्या आश्रयामुळे वाचले आहेत. जर स्वामीचा आश्रा नसता तर आजपावेतो मोक्षास गेले आस्ते. पाछायासी सुख नाही. याचप्रा चिरकाल चालायाचे नाहीं तर स्वामीनी पाछायाचा बंदोबस्त बांधोन दिला तर कांही उतम आहे. बाकी येवज येथे काहीच नाही. हे विज्ञापना.
3722