Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 27.227: [3-8-1758] Trimbak Shivdev announces Raghunathrao's return to the South after briefly referring to his successes in the Punjab. Jankoji Sindia is reported to be investing Shahapur.

Selections from the Peshwa Daftar 27.227

Language
Marathi

27.227

श्री

श्रीमंत राजश्री पंत

प्रधान स्वामींचे सेवेसी

विनंती सेवक त्रिंबकराव सिवदेव कृतानेक साष्टांग नस्कार विनती विज्ञापना. तागायेत छ १८ माहे जिलकाद् जाणून स्वामीचे कृपेद्रिस्टीकरून सेवकाचे वर्तमान यथास्थित असे विशेष. श्रीमंत राजश्री दादा स्वामीनी देशास जावयाची आज्ञा केली होती त्यावरून राजश्री गोविंद बलाल याजपासून निरोप जेस्ट वद्य प्रतिपदेस घेऊन निघोन मालवे प्रांती प्रगणे आगरास आलो. येथील बंदोबस्त करून आठा दाहा दिवसानी कूच करून स्वामी दर्शणास येतो. श्रीमंत राजश्री दादा स्वामी लाहूरचा बंदोबस्त करून अबदालीस नतिजा देऊन माघारे जयनगर प्रांतास आले. उमेंदसिंग शाहापूरवाला याचे ठिकाणास राा जनकोजी सिंदे लागले आहेत. त्यास मार्गी येतां त्याची मामलत चुकऊन मज्ल दरमजल उजिनीस सत्वरच येतील. श्रावण अखेर पुणेयासी पोहचावे ऐसा विचार आहे. वरकड व्रत सेवेसी आलियावर निवेदन करू. राजश्री समसेरबाहादर बाबा हिंदुफ्तची मामलत चुकऊन कूच केले. सत्वरच देशास येतील. सेवेसी श्रुत होये हे विज्ञापना.