Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 27.228: [6-8-1758] Instructions to Malharrao Holkar that the Pawar's share of the tribute from Kotah be directed to be paid into the Peshwa's treasury in lieu of the debts due from him.

Selections from the Peshwa Daftar 27.228

Language
Marathi

27.228

श्री

राजश्री मल्हारजी होळकर यास पत्र जे राजश्री येसवंतराव पवार याजकडे सरकारचा पैका येणे. त्यास सौंस्थान कोटे येथील खंडणीमध्ये मारनिलेचा हिसा येणे व माहालचा सालवारचा ऐवज मारनिलेचा येणे. त्याचे ऐवजी येसवंतराव याणी रुपये १८४००० येक लाख पंच्याअसी हजाराची चिठी दिली. त्याचे वसुलास साल गुाा कोटेयास राघो केशव ठेविला होता. त्यास व्यथा होऊन मृत्य पाा. सालमजकुरी गणेश अनंत रवाना केला आहेत. तरी सालगुदस्ता जो वसूल जाहाला असेल व सालमजकुरी तुम्हाकडे अगर सिंदे याजकडे जो वसूल होईल त्याचा पवारांचे हिसेयाचा ऐवज सरकारचे कारकुनाचे पदरी घालून

3723 बाकीचा ऐवज ज्याचा जैसा असेल त्याप्रा॥ घेणे. सरकारचा ऐवज पदरी न पडता कोणी येक पैसा घेईल तरी घेऊ न देणे. येविषयी पेशजी येक दोन पत्रे सादर जाहाली आहेत व चिरंजीव दादास लिहिले आहे व राजश्री दत्ताजी सिंदे यासहि आज्ञा करणे ते रूबरू केली आहे; तरी सदरहू ऐवज झाड्यानसी वसूल होय ते करणे. सालगुदस्ता तुम्हाकडील कमाविसदाराकडे वसूल जाहाला आहे, त्याचा हिस्सा सरकारचा पोहचला नाही, तरी बेजरब ताकीद करून सालगुदस्ता तुम्हाकडील वसुलास कोण आला होता त्याने जबरदस्तीने सरकारचा हिसेबाचा ऐवज न देता वसूल नेला. त्याचा शोध करून झाड्यानसी हाली गणेश अनं(त) कारकून तेथे आहेत त्याचे पदरी घालवणे. सरकारचा लांड्या न ठेवणे

म्हणून पत्र

पत्र मल्हारबास देणे

छ १ जिल्हेज उर्फ श्रावण सन तिसा