Selections from the Peshwa Daftar 27.229: [10-9-1758] Madhavrao Shivdev Odhekar informs the Peshwa of the help he had rendered to Raghunathrao in crossing the Nerbudda with his troops, on his way to the South.
Selections from the Peshwa Daftar 27.229
- Language
- Marathi
27.229
पो॥ छ २२ मोहरम
[seal: श्री]
श्रीमंत राजश्री पंतप्रधान
स्वामीचे सेवेसी
पोष्यांकित आज्ञाधारक माधवराव सिवदेव कृतानेक सा॥ ना विनंत्ती विज्ञापना. येथील कुशळ ता॥ छ ६ मोहरम सेवकाचे व परगणे मजकूरचे वर्तमान यथास्थित असे. साहेबाही आज्ञापत्र पाठविले तेथे आज्ञा की श्रीमंत राजश्री दादासाहेबाचे स्वारीचे साहित्य उत्तम प्रकारे करणे. त्याजवरून सर्व साहित्य करून पुढें माणसें पाठविली होती. ती माणसे सैन्यांत नवलाईचे मुकामी श्रावण शुध १५ पौर्णिमेस होतीं. वद्य प्रतिपदेस लशकरचा कूच होऊन मजल दरमजल मंडळेश्वराच्या घांटे नजीक चोळीमेश्वर तेथें उतरून सेनासहवर्तमान त्याच मार्गे सेंधमियावरून गेलेत. हे वर्तमान छ ५ मोहरम रोज मंदवासरी आले हे तथ्य असे. श्रुत होये. बहुत काये लिहिणे हे विज्ञापना.
[१ लांह्या an unclosed business.]
3724