Selections from the Peshwa Daftar 27.230: [September 1758] This appears to be a draft summary of the letter despatched by Antaji Mankeshwar to the Peshwa wherein are clearly mentioned the duties assigned to Jankoji Sindia, Malharrao Holkar and Antaji Mankeshwar himself.
Selections from the Peshwa Daftar 27.230
- Language
- Marathi
27.230
श्री
श्रीमंतै राजश्री नानासाहेबांची पत्रे
१ मलहारजी होळकर व जनकोजी सिंदे यांच्या भेटी जाल्या. कोव्याचा राजा मेला सबब सुभेदार कोव्यास गेले तों त्यांचे वकील येऊन मामला सिंदे यांजवल फैसल केला. वसूल मात्र सुभेदार घेतील.
१ नजीबखान रोहिले याणी पातशाहाजादा नवा केला. हंगामा मांडिला आहे. त्याजवरी आपण गेलो. जनकोजी सिंदे याणी दोन हजार फौज आम्हाकडे पाठविली.
१ लाहोरचे व पूर्वेचे काम आहे. त्यास रोहिल्याचें काम जाले म्हणजे जनकोजीबाबा व आम्ही मिलोन दोनी कामे आटोपू.
१ हुजूर यावयाविसी आज्ञापत्रे आली. त्यास अगोधर आलीं असतीं तरी येतों. श्रीमंतौनी चाकरी नेमिली. चालीस लाखास गुंतलो. फौज ठेविली. पुत्र कोणी जवळ नाहीत. पुत्रांची रवानगी करून पाठवावे म्हणजे आम्ही येऊं. त्यांच्या गळां हे काम घालितों, नाही तरी अखेर-साली येऊं.
१ दंडाराजपुरीचे मसोदे हिंदवी पारसी पाठवावे. त्याप्रो फर्मान सिध करून पाठवितो.
१ मौजे चास घेतली. त्याचे मुबदला गांववाडियाचें काम पडिलें. ते व पारनेर परगण्यांत दोन खेडी वतनाची दिल्ही ते देवावी.
१ जनकोजी सिंदे यास ताकीदपत्रे की मारवाडांत तूर्त न जाणे; दि(ल्ली)कडे जाणे. तुमच्या उपरालियाने रोहिल्याचें काम अंताजीपंत करितील.
१ अदिनाबेग संदीषबेग त्याविसीं सिंदे यास पत्र कीं जो करारनामा वाटा जाला आहे त्याप्रो चालावें.
१ सिंदे यास निक्षूण ल्याहावें कीं पूर्वेची स्वारी व लाहोरची स्वारी त्यापैकी येक तुम्ही करणे; येक अंताजीपंत, पातशाहा वजीर करितील.
[१ हा अंताजी माणकेश्वरानें पेशव्यास पाठविलेल्या पत्रांचा सारांश दिसतो.]
Bk Ca 11-29
3725
Discussed in (1)
- Fall of the Mughal Empire — Sarkar 1932, English