Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 27.231: [September 1758] Antaji Mankeshwar pleads his innocence against charges of neglect of duty and personal gratification. He advises that Jankoji Sindia be instructed to march into the Punjab while he himself will undertake an expedition into Bengal in concert with the Vazir.

Selections from the Peshwa Daftar 27.231

Language
Marathi

27.231

सेवेसी विज्ञापना. आम्ही पंचवीस तिसा लाखाचे कर्जदार म्हणून रान डोईवरी घेतले की देशास जाताच आबरू न राहे व दिवाणचे चाळीस लाखाची निशा केली त्याची दाम दाम फडशा व्हावा. नवा मनसबा करावा. आमची खराबी सर्व स्वामीच्या ध्यानांत असतां खावंदापासी लबाडी बहुत्यानी केली तरी आम्ही स्वामीसंनिध. आता कोठे येक पैशाचे अंतर असिले तरी स्वामीस विदित आहे. इतके करून खावंदाच्या मनात कर्जामुले काहीतन्ही याचे होऊ; परतु यासी दांडें बांधावा तरी मजपासी येक रुपया असेल तरी झाडा क्रिया घ्यावी. से दोनसे उंटे तंटे घरची आहेत ती नजर आहेत. मी स्वामीचे आज्ञेनिराळा नाही. येक वस्त्रानसी घराबाहेर निघावयासी तयार आहे, गुंता नाही. हिसेब मुलास पुसतां तरी ते लेकरू त्यास ज्ञान काये ? हिसेब वारावयाचा खावंद मी आहे. आसो. आपण माझे मस्तकी हात ठेविला त्यात वरीसभर सर्वाप्रकारे आपण सिधीस न्यावे. बोलिलेप्रा सेवा घडोन आली तरी सेवकाचा शेवटच करणार स्वामी समर्थ आहेत. मुलास निरोप द्यावा. सदैव पत्री सेवकास गौरऊन सिंध्यासहि लिहीत जावे. आम्हासहि लिहीत जावे. जनकोजी सिंदे यासी ताकीदपत्र आमच्या कागदाबराबर पाठवावे. त्यात मतलब "तुम्ही पत्रदर्शनी दिलीस जाऊन रोहिल्याचे पारपत्य सत्वर करणे. पुढे अंताजीपंत आहे परंतु तुम्ही सत्वर उपराळियास जाणे व लाहोरचा बंदोबस्त अटकपर्यंत खासा जाऊन करणे. बंगालियासी वजिराची अंताजीपंताची आधी रवानगी करणे. दिवसगत न लावणे. वजीर पातशाहा याचा निमे वाटा आम्ही करून शफतपूर्वक तहनामा सिकियानसी दिल्हा आहे त्यात आंतर न करणे. कोणाच्या सांगितल्यावरून सरहद, दुवाब, लाहोर येथील हिंसा द्यावयासी अंतर न करणे. क्रिया त्याची आमची जाळी त्यात आंतर न करावे. अंताजीपंताचा जामिनीचा यैवज व फौज वजिराने ठेविली तिचा यैवज वजिराकडे भारी. गुंता अंताजीपंताचा जाला आहे याजकरिता वजिराचा हिशियाचा यैवज दिनबेग संदीषबेग याजकडील अताजीपंताचे मारफातीखेरीज न देणे. काही आपला गला उगववितील. काही त्यास देऊन त्याचेहि चालवितील. सारांश वजिराच्या हिशात काही खलेल कराल तरी अंताजीपंताचा पैका वजिराकडील झाडून देणे होईल व वचनप्रमाण राहणार नाही. मागती बखेड़ा राहील. तुम्हास कोणी मसलत सांगितली असिली तरी वाईट. आमच्या इमानात अंतर न करणे. वजीर, पातशाहा, अंताजीपंत बंगालियास जातील. तो पैका बिनखर्ची आमचा निमे होईल. नाही तरी त्या

[+ पत्र अंताजी माणकेश्वराचें. १ दंड.]

3726 हिशास खलेल पडेल. मुख्ये तहात अंतर न करावे" म्हणौन पत्र लिहून आम्हाजवळ यावयास स्वामी समर्थ आहेत. प्रस्तुत आजी जनकोजीबावाचे येक पत्र आताच कासीद घेऊन या मजलीवरी आला आहे. तेहि त्याच्याच कासिदाबा सेवेसी पाठविले आहे. सारांश आम्हावरी हला आहे. आज्ञेखेरीज वर्तणूक केली नाही. पुढे करणार नाही यैसी क्रिया केलीच आहे. फार काये ल्याहावे ? सेवेसी श्रुत होये हे विज्ञापना.