Selections from the Peshwa Daftar 27.232: [Recd. 12-10-1758?] The writer (Mahadaji Govind Kakde) regrets the unfortunate attitude taken up by the Peshwa in connection with some money matters which were falsely reported to him by Pratap and Visaji Ballal. The writer protests to Raghunathrao against the action of these two.
Selections from the Peshwa Daftar 27.232
- Language
- Marathi
27.232
पौ छ ९ सफर सु॥ तिसा
श्रीपांडुरंग
पुरवणी श्रीमंत राजश्री दादासाहेब स्वामी
माहाराजाचे सेवेसी
विज्ञापना. श्रीमंत राजश्री नानासाहेब याणी बोडस्याकरिता आम्हावर मोठा शह आणिला आहे. त्यास बोडसे आम्हास भारी आहे यैसें नाही. शोध मनास आणितां प्रतापसा व विसाजी बलाल या दोघावेगळे कोणी पांच हजार रुपये पुरले यैसे सांगत नाहीं. याकरितां प्रतापसा राजश्री समसेरबाहादूर यांजपासी आहे. विसाजी बलाल पुण्यास गेलेच आहेत. दोघास पाठऊन द्यावे. त्याचे इजतीचे आबरूचे आपण आभये द्यावे. ते येथे आलियावर बोडस्याची जागा हातभर राहो देत नाही. बोडशातून धन काढून स्वर्गी कुबेरापासी पोहचविले आसिले तेहि आणवितों. मग मृत्यलोकी जेथे असेल तेथून आणऊ यास अपूर्व काये ? येविसी आपल्याकडे श्रीमंत स्वामीचा शह आहे याकरितां हें कार्य आगत्य केले पाहिजे. प्रतापसा, विसाजी बलाल दोघांवेगळे ती वर्षांचे पोर ठेवीची गोष्ट सांगते तरी खामखा गोष्ट करून घेतो. दोघास आगत्य पाठविले पाहिजे. श्रीमंत् राजश्री नानासाहेबी आम्हांस आज्ञापत्र सादर केले, तेथे लिहिले जे बोडशाकरितां नारो शंकर यांची मामलत तुम्हांस सांगितली. तरी मी बारगीर; वरकड कामेकार्जे केली ती व्यर्थ गेली. प्रतापसा, विसाजी बलाल खरे जाले. आम्ही रुषवैत खाऊन सरकारकामाची नुकसानी केली यैसें जाले आहे. माहाराजानी चित्तावर धरून येवढी गोष्ट सेवटास नेणार धणी
१ लांच.
समर्थ आहेत. उभयेतास आभये द्यावे येसी प्रार्थना लिहिली आहे. परंतु येक शर्त. ते जेथे सांगतील तेथे खाणे. रुपये सांपडले उत्तमच जाले. धण्याचे कार्य जाले. आम्हाकडे लटीकवाद आला, उत्तम. रुपये न सांपडले तरी त्या खासेत दोवास घालून पुरून टाकीन. ब्राह्मण म्हणार नाहीं. विदित होये. अमर्याद करून लिहिले जैसे ध्यानात येईल तरी प्रतापसा व विसाजीपंत यास वाकीफ म्हणून माहाराजाही दिल्हे. त्याणी येकेक फितूर केले. अगदी मामलत बुडावी तो विचार पत्री लिखिता येत नाही. समक्ष विनंती करीन. आलो कोणा कार्यास, करितो काये, हे ज्ञान न मिळे. रुपये मेलवावे हे अकल, श्रीमंत् राा नानासाहेबास प्रतापसाने लिहिले जे, येकनिष्ठ चाकर म्हणून आमचे न आइकले. अनेक प्रकार लिहिले त्याची नकल आहे. विसाजीपंत कमरबंदी करून गेले. नाना प्रकार कल्पना केल्या त्या स्वस्थळास गेलियावर ध्यानास येतील. अतिशये जाला म्हणून लिहिले. आम्हास सर्व राजी, मुलूक फौज वाटसरू, हे दोघे कसे खरे? आम्ही कसे लटके? हे अपूर्व, सर्वजाण धनी समर्थ आहेत हे विज्ञापना.