Selections from the Peshwa Daftar 27.234: [1758] Vithal Shivdev inquires whether the Shrimant's departure has been postponed, referring probably to Raghunathrao.
Selections from the Peshwa Daftar 27.234
- Language
- Marathi
27.234
श्री
१विनंती उपरी. रात्री श्रीमंताची चिठी आली होती की बापू प्रातःकाली जातात. तुम्ही सत्वर तयार होऊन येणे. त्यास श्रीमंताचे राहाणे आज केले की काये? रात्री काय मजकूर जाला तो आपण लिहिलाच नाही. श्रीमंताची आपली भेटी जाली की काये हे लिहिले पाहिजे. माहात राजश्री अंताजीपंती नेले. तैनात भारी केली हे तहकीक आहे. ते तो शेफत वाहतात. याची प्रमाणिकता फौज तो दूर केली त्यानी धरून ग्वालेरांस द्यावे. सर्व खरें. नाही तर हे गोष्ट. हाती दरोबस्त रिकामे. विसा वर्षांचे माहात. पागा सोडून देवकराने जावे यैसे नाही. त्यास गंगाधर गोजाजी रुसले. त्यांची पागा त्यास देऊन त्यास नेले. येथे तो शेफता प्रमाण सर्व दाखवितात. यांचा प्रांत काये करावा? आपल्यास तो आज फार वाईट वाटले आहे. सर्व दृष्टीस आपल्यावर आहे. बहुत काये लिहिणे हे विनंती.
[+ या पुढील मजकूर भाऊसाहेबांच्या हातचा.]
[१ विठ्ठल शिवदेवांचें हस्ताक्षर.]