Selections from the Peshwa Daftar 27.235: [3-10-1758] Govind Ballal to Mahipatrao Chitnis to the effect that he has a hard task before him in putting down the rebels in his district. Govindpant writes this after his return from the Deccan in 1758.
Selections from the Peshwa Daftar 27.235
- Language
- Marathi
27.235
श्री
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री
महिपतरावजी गोसावी यासी
स्नेहप्रीतिपूर्वक गोविंद बळाल आसीर्वाद विनंती उपरी. येथील कुशल ता॥ आस्विन सुध प्रतिपदा जाणून स्वकीये लिहीत आसिले पाहिजे विशेष. या प्रांतीचे सविस्तर वर्तमान श्रीमंताचे पत्रां लिहिले आहे त्याजवरून कळेल. आम्ही आपले आसो. सदैव कुशल वृत्त पत्रीं संतोषावीत आसिले पाहिजे. इकडेहि जमीदारानी मोठासा कजिया आरंभिला. आम्ही इकडे आल्यावर येक दोन जुंजे जाली. काही मारिले गेले. काही राहिले त्याचे तळाशात आहो. सदैव आपले कुशल वर्तमान लिहून संतोषावीत आसिले पाहिजे. बहुत काये लिहिणे? कृपा लोभ आसो दीजे हे विनंती. राजश्री रामाजीबावास आसीर्वाद लि॥ परिसीजे. सदैव आपले कुशल वर्तमान लिहून संतोषाविले पाहिजे. बहुत काये लिहिणे? लोभ असो दीजे हे विनंती. समस्त मंडली आसीर्वाद.