Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 27.236: [Sept. 1758] Draft of a letter from Antaji Mankeshwar to Raghunathrao suggesting to the addressee that Sindia's forces be advised to proceed to the Punjab to settle matters with Adinabeg while the writer himself accompanies the Emperor to Bengal to guard Maratha interests in that quarter.

Selections from the Peshwa Daftar 27.236

Language
Marathi

27.236

श्री

श्रीमंत राजश्री दादासाहेबांचे

पत्रीं जाजती मार

१ सिंदे यांची मामलत जैनगरची केली. च्यार साले छत्तीस लाख व यंदाचें नव लाख व नजर तीन लाख याो बारा लाख येणेप्रो केले.

१ आमचा बोल उपर राखोन सिंदे यास ल्याहावें.

१ आम्हास पत्रं उलगडून ल्याहावीं म्हण्जे उमज पडेल.

[+ यादी अंताजी माणकेश्वराची.]

१ मुख्य जनकोजी सिंदे यास ल्याहावें की रजपुताणियात न जाणें. आदिनाबेग संदीपंवेगास ताकीद करून तहनामियाप्रां वजिराकडील वांटा अंताजीपंताकडे देणे; म्हणजे त्यांचा काल चालवितील व आपला गला मोकला करितील. बंगालियास वजीर पातशाहा व अंताजीपंतास जरूर रवाना करणे म्हणून.

१ श्रीमंत राजश्री नानासाहेब रागे आहेत. त्यास मी कर्जदार आहे. मजपासीं च्यार तटं उंटे आहेत ती श्रीमंतास नजर करावी.

Discussed in (1)