Selections from the Peshwa Daftar 27.237: [26-4-1759] Babukhan has been reappointed to the command of the fort of Payagad.
Selections from the Peshwa Daftar 27.237
- Language
- Marathi
27.237
बाबूखान खुशवख्त बाशद
[seal: तहवर व जलादत दस्तगाहा]
सु॥ तिसा खमसैन मया व अलफ.
किले पायागडची किलेदारी तुम्हाकडून राजश्री जनकोजी सिंदे याणी तगीर करून सेख मर्तजास किलेदारी सांगून पाठविले ते जाता मार्गी कजिया होऊन धरले गेले. ते किल्यावर न जाता अगोधरच तुम्ही खाली उतरला म्हणून हुजूर वर्तमान आले. ऐशास मारनिलेहि किल्यास न पोहचले व तुम्ही अगोधरच उतरला. किल्याचा बंदोबस्त राहिला पाहिजे. याजकरितां तुम्हास लिहिले असे तरी तुमचे कारभारी किल्यावर आहे(त) (त्यास) लेहून [शिका] किल्याचा बंदोबस्त रा(खणे). हुजुरून कृष्णाजी अनंत फौज सुधा त्या प्रांते पाठविले आहेत. हे जाऊन बंदोबस्त करितील. तोपावेतो आपले कारभारियापासून बंदोबस्त राखवणे. कृष्णाजी अनंत याचेहि प्रत्ययास आणून दाखवणे. सेख मर्तजा किल्यास जाऊन संद्याचे सनदेप्रो दाखल होत तोपावेतो किल्याचा बरा वाईट कारभार तुमचा जिमा आहे. जाणिजे छ २८ शाबान. दराज काये लिहिणे ?
[seal: लेखन सीमा.]