Selections from the Peshwa Daftar 27.238: [24-1-1736] Satavoji Jadhav explains to the Peshwa his activities in Bundelkhand and solicits advice from him as regards the recovery of tribute.
Selections from the Peshwa Daftar 27.238
- Language
- Marathi
27.238
श्री
राजश्री पंतप्रधान गोसावी यासी
श्रीमंतसकलगुणांलकरण अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नेहांकित सटवोजी जाधव कृतानेक दंडवत विनंती. येथील क्षेम ता॥ छ २१ रमजान मु॥ अलोरी प्रांत भदावर यथास्थित जाणून स्वकीय कुशललेखनाज्ञा केली पाहिजे विशेष. स्वामीकडून पत्रे येऊन कुशलवृत्त कळो येत नाही. तरी सदैव आपणाकडील वृत्त लेहून पाठवीत असले पाहिजे. आम्हाकडील दोनतीन पत्रे तपशीलवार वर्तमान लेहून पाठविली ती प्रविष्ट होऊन शेवसी श्रुत जाहाले असेल. सांप्रत आम्ही सैन्यसहवर्तमान भदावरचे सरदेस आलो. संस्थानिकाकडून मातबर आले. बहुत स्नेहभावाचा अर्थ सांगोन पाठविला कीं आम्ही आपल्यासी तीन वर्षे स्नेह संपा दिला आहे. गतवर्षी ताराच्या सैन्यातून द्रव्य रेवातीरी प्रविष्ट केले. सालमजकुरी पर्जन्याची अतिवृष्टि जाहाली. गुदस्ताप्रा॥ मामला करावा त्यास गुदस्ताच घ्यावा येसा अर्थ काये आहे? जेथवरी दबाव देऊन करार करावयाची ते करून काही अधिकोत्तर करून विल्हे लाविले. पैका आणावयासी गेले आहेत सत्वरच येऊन पावतील. याउपरी आम्ही सेखाचे महु बुंधेलियाची व भदावरचे सरदेस जाऊन राहातो. बुंधेलियाकडील दिवाण व गोविंद बल्लाळ याचे आगमन जाहालियानंतर जो विचार करणे तो करून. स्वामींचे पुण्यप्रादुर्भावेकडून योजिला मनसबा सिधीस पावेल. तीन मास दिवस आहेत. मुलूक कौली. अगदी पोट भरावयासी जागा येमुनावर नाहीं. स्वामीकडे पत्रे गेली आहेत त्याच्या उत्तराची प्रतीक्षा करितो. आज्ञा येईल त्याप्रा॥ वर्तणूक करून. सविस्तर अर्थ राजश्री भिवराऊ याणीं लि॥ आहे त्यावरूत श्रुत होईल. विशेष काय लिहिणे? कृपा केली पाहिजे हे विनंती.