Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 27.239: [23-5-1759] Jankoji Sindia writes to Raosaheb that a detailed letter, in explanation of the queries regarding the writer’s activities in Marwad, Punjab, and his proposed invasion of Bengal, has been despatched herewith.

Selections from the Peshwa Daftar 27.239

Language
Marathi

27.239

छ २९ जिलकाद

श्री

श्रीमंत राजश्री रावसाहेब

स्वामीचे सेवेसी

विनंती. सेवक जनकोजी शिंदे कृतानेक दंडवत विज्ञापना. सेवकाचे वर्तमान ता॥ छ २९ रमजान प्रो॥ किराणा अंतरवेद स्वामीचे कृपावलोकनेकरून यथास्थित

[+ अक्षरे सटवोजी जाधवांचीं.]

3732 असें विशेष. सरकारची आज्ञापत्रे छ २९ जमादिलाखरची पाठविली ती छ १९ रमजानी पावली. दुसरें पत्र छ २१ रजेबचे पाठविलें ते छ १६ रमजानी सादर जालें. तेथें आज्ञा मारवाडचा रुपया फार उगवणें होता तो कसकसा उगवला व लाहूर प्रांतीचा बंदोबस्ताविसी व पूर्वेकडे जाऊन मातबर काम करून पैका उदंड मिळऊन सरकारचे कर्ज वारे व रोहिला नजीबखान याचा मजकूर व अंताजी माणकेश्वर यांस हुजूर पाठवावे वगैरे मनसबे बहुता प्रकारचे आज्ञापिले ते सविस्तर कळले. ऐसियास येतद्विशईचा अर्थ अलाहिदा पुरवणीपत्री तपसीलवार विस्तारें सेवेसी विनंती लिहिली आहे त्यावरून विदित होईल. सेवेसी श्रुत होय हे विज्ञाप्ति.

Discussed in (1)