Selections from the Peshwa Daftar 27.240: [30-7-1759] Raja Keshavrao writes to the Peshwa that negotiations for the delivery of the three holy places—Benares, Prayag, Gaya—are being uselessly protracted with a view to defeat Sindia's objective.
Selections from the Peshwa Daftar 27.240
- Language
- Marathi
27.240
पोा छ १२ सफर सितैन
श्रीमंत माहाज धर्मधुरंधर
राजश्री पंडित प्रधान बालाजी-
राव नाना स्वामी गोसावियाचे
सेवेसी
श्रेष्ठांकित राजा केशवराव कृतानेक नमस्कार विनंती उपरी. येथील क्षेम ताा छ ५ जिल्हजे मुकाम झांसी जाणून स्वकुशल लेखनाज्ञा केली पाहिजे विशेष. हिंदु-स्तानचे सकल वर्तमान विनंतीपत्रात लिहीत असतां कितेक प्रयाग व कासी व गया हे तीर्थांची स्थलें स्वाधीन असलिया त्रिस्थलीयात्रा सर्वास निरोपद्रव होईल. येथील तीर्थी यवन संचार राहील आसी वर्तमाने सेवेसी विनंती लिहिली असतां आज्ञा आली की राजश्री जनकोजी व दत्ताजी सिंदे सर्व कार्यानिमित्य ते प्रांतीं आहेत त्यांस ही सुचावणी वरचेवरी लिहावयाची लिहीत जाणे. मग ते जसे अनुकूल पडेल तसे करितील व आम्हांसहि वरचेवरी सर्व लिहीत जाणें. त्याज-वरून सरदारास सदैव पत्रे पाठवितो व सर्व वर्तमान सुचावणी लिहायाची ते लिहीत आहो. तेहि मान्य करिताती व त्याजप्रमाणेंच प्रयाग व कासीचा पैगाम वजिरास केला की याची सनद आम्हास करून देणे. त्यास वजिरास सुजाउदौला नाजीम अवंध याचा पक्ष व त्याजअधीन वाराणसी व प्रयाग असे. याजकरि(ता)
सनद देयास अनमान करून उत्तर देताती. तुम्ही प्रबल आहा. सनदेचे अगत्य नाही. जो देश कबज करायाचा तो कराल व तिकडे सुजायेद्दौलाास त्याचे म्हटलेप्रमाणे आश्वासन लिहिताती व तोहि यास आश्वासन लिहितो की सरदारास इकडे आल्याने मी समजेन. तुम्ही खातीरजमा राखणे. त्याजला आपला सिपाहगरी व फौज व तोपखानियाचा गरवर फार आहे. दुसरे गंगा मधे आहे ते उतरोन जाऊन त्याचे मुलकात जावे लागते. ते पर्जन्यकाल गेलियावाचोन अनकूल पडत नाही व त्याचे म्हणजे सुजाउद्दौलाचे मुद्दई रोहिले व अहमदखान बंगश आहेत. आद्यास रोहिले म्हणताती, आमचा मुलक गंगापार आहे तो तुम्ही रक्षा, आम्ही वाट देतो व अहमदखान बंगशाचा मुलक गंगापार नाही, गंगावार आहे. तो म्हणतो की मी तुम्हास आपले मुलकातून गंगा उतरोन देतो व तुमचा रफीक आहे. माझी दस्तगिरी करा असे सर्व रूजू जाले असती. वरषाकालानंतर जरी सरदारास गंगापार उतरणे तरी उतरतील व प्रयागास जायास तो (अपूर्ण)