Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 27.246: [Recd. 20-1-1760] Bapuji Mahadev Hingne's letter to Bhausaheb, referring to the inquiry into the conduct of the writer and Antaji Mankeshwar which led to the mismanagement of affairs in the North.

Selections from the Peshwa Daftar 27.246

Language
Marathi

27.246

छ १ जमादिलाखर

श्री

पु॥ श्रीमंत राजश्री भाऊसाहेब

स्वामीचे सेवेसी

विनंती येसीजे. येथें रा॥ बाबूराऊ फडणीस याणी सांगितलें जे, श्रीमंत राजश्री नानासाहेबाची मरजी आहे जे, भाऊसाहेबाकडे बापूजी माहादेवास जाणें लागेल. अंताजीपंताकडे मरजी आहेसे दिसते. तुमचे चालणें होणार नाही म्हणून सांगतात. त्यास सेवकाची पत मानपान राहे ते करणार स्वामी समर्थ आहेत. सेवेसी श्रुत होय. सेवेसी श्रुत होय. बहुत काय लिहा ? कृपा केली पाहिजे हे विनंती.