Selections from the Peshwa Daftar 27.247: [16-1-1760] Ramaji Anant Dabholkar to the Peshwa : writing about the engagement between the Gilchis and the Maratha forces, in which Dattaji Sindia lost his life.
Selections from the Peshwa Daftar 27.247
- Language
- Marathi
27.247
पो॥ छ २८ जमादिलाखर
सु॥ सितैन माघ वद्य
आमवशा मंदवार
श्री
श्रीमंत राजश्री पंत प्रधान
स्वामीचे सेवेसी
विनंती. सेवक रामाजी अनंत कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना. येथील वर्तमान ता॥ पौष बहुल त्रयोदसी मुा पनाळी पा कोटपुतळी प्रा॥ जैनगर स्वामीचे कृपावलोकनेकरून यथास्थित असे विशेष. येथील वर्तमान तरी गिलज्या अंतरवेदीत गेलियावर नजीबखान व गंगापारचे रोहिले सादुलाखान व दुंदेखान वगैरे सर्व त्यास सामील होऊन दिली घ्यावी हा इत्यर्थ करून दरकूच दिली संनिध येमुनातीरास पनास हजार फौजेनसी आले. आपल्या सध्या फौजा आलीकडे होत्या. घाट धरून राहिले होते. त्यास पौष वद्य आष्टमी गुरुवारी प्राथ:कालचे प्रहर दिवसास गिलजे व रोहिले यानी घाटावर चालोन आले.
3738 बंदुखांचा व बाणांचा वगैरे मार करीत दोन धारा येमुनेच्या उतरोन आले, तेव्हां आपल्या फौजा त्याजवर गेल्या. लढाई जाली. दत्ताजी पाटील लढाईत कामास आलें ; मोठी फटकाळ गोष्ट जाली. राजश्री जनकोजी सिंदे यांचे उजवे हाताचे दंडास गोली लागोन पार होऊन गेली. स्वामीचे पुण्यप्रतापे खैर जाली. तदनंतर सर्व लस्कर बुलगेसुधा संभाळून रेवाडीवरून जाटाचे मुलकांतून जैपुरचे सरदेस आलो. येथे राजश्री मल्हारजीबाबा होलकर यांची भेट जाली. येकां दो दिवसांत त्यांचे व आमचे बुलगें या मुलकांत ठेऊन सड्या फौजा करून अविलंबे दिलीस गिलजे रोहिले यांचे पारपत्यास जात असों. सेवेसी श्रुत होये हे विज्ञापना.