Selections from the Peshwa Daftar 27.248: [20-3-1758] Bagaji Gangadhar mentions the plans which he intends to pursue in restoring order and recapturing the places round about Meerut.
Selections from the Peshwa Daftar 27.248
- Language
- Marathi
27.248
No. 248] [20-3-1758
श्रीगजानन
विनंती. सेवक बगाजी गंगाधर कृतानेक साष्टांग नमस्कार विनती. विज्ञापना की फालगुण शुध ११ येकादसी सोमवारी कसबे मेरठस येऊन राजश्री गोपालपंत नानास ठाणे मजकुरी दाखल केले. प्राा जलालाबादेसहि त्याच्या ग्रहस्त ठाणियात बसविला. प्रोा बेढात गिरमाजीपंत ठाणियात दाखल केले प्रोा बारनावदा व सामली वगैरे माहाली ठाणी बसविली. मेरठच्या बंदोबस्तास * * * गोपालपंत नानास पुसोन पुढे जाऊन * आपले प्रतापे ठाणे बसवितो. राजश्री त्रिबंक भास्कर आद्यापि आले नाहीत. आम्हीं आपल्या पतकानसी मात्र आहोत. पुढे शुक्रताल जवळ येत चाललें. फौजेचा भरणा पाहिजे. सिंदे होलकर याजकडीलहि कोन्ही आद्यापि आले नाही. पूर्वी कागद पाठविला त्यांत लिहिले त्यावरून ध्यानास येईल. सुकुरतालाकडे कासीद पाठविले आहेत. तेथील बातमी आली नाहीं. आल्यावरी सेवेसी लिहून पाठऊं. बहुत काये लिहिणे. बहुत काये लिहिणे? कृपा लोभ असू दीजे हे विज्ञापना.
[१ मुळांतच दुवार आहे.]
[+ पत्राच्या पाठीवर ता जास्त कलमांत बारा ओळी मजकूर आहे तो नकलला नाहीं.]