Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 27.249: [Recd. 27-2-1760] Funds amounting to Rs. 77,650 are despatched to the Bhau.

Selections from the Peshwa Daftar 27.249

Language
Marathi

27.249

पौ छ ९ रजबू

श्री

आसीर्वाद उपरी. दोन लक्ष रुपये येथून पाठवावे त्यास

२५००० चंदेरीच्या रसदीपैकी

५२६५० मल्हार कृष्ण यांजकडून

७७६५०

येकूण सत्याहातर हजार सासे पनास रुपये सदरहूप्रा। देविले असेत. पावतीत. दोन लक्ष पैकी बाकी राहिली तेहि मागाहून पावले होतील. दोन लक्षांहून ज्याजती ऐवज जमा होईल तो तुम्ही खर्च न करणे. त्या येवजावर येथून वराता होतील त्याप्रमाणे देणे हे आसीर्वाद.