Selections from the Peshwa Daftar 27.250: [3-3-1760] Yeshvantrao Bhaskar informs Bhausaheb of details of the Peshwa's marches and halts from Kalegaon to Paddur where they were to meet and decide about sending reinforcements to the North.
Selections from the Peshwa Daftar 27.250
- Language
- Marathi
27.250
पो छ १९ रजब
सितैन फाल्गुण
श्री
श्रीमंत राजश्री भाऊसाहेब
स्वामीचे सेवेसी
आपत्ये येसवंतराव भास्कर दोनी कर जोडून सिरसा ना विज्ञापना. ता॥ छ १४ रजब मुा वोझर पा राजणी दुधनानदी स्वामीच्या कृपावलोकने सेवकाचे वर्तमान यथास्थित असो विशेष. स्वामीकडून आज्ञापत्र छ ७ रजबचे घेऊन आले ते छ मजकुरी सांईकाली साहा घटका रात्रीस पावले. जासूद मजकुराची पारपत्ये केली. कालचा श्रीमंताचा मुकाम रविवारचा कालेगांव पा। जालनापूर दुधनेवरी होता. आज सोमवारी कूच करून मुकाम मजकुरास आलो. उदईक कूच करून पडदूरच्या उतरेस कोसावरी दुधनेच्या तीरी मुकाम नेमिला आहे. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.
3740