Selections from the Peshwa Daftar 27.251: [5-3-1760 ?] This appears to be the missing second sheet of Letter No. 118 of Vol. 2 (The Battle of Panipat) from Raja Keshaorao.
Selections from the Peshwa Daftar 27.251
- Language
- Marathi
27.251
( पहिला बंद गहाळ )
सर्वांस धैर्य जाले. माहाराजाचा अखंडित प्रताप आहे. माहाराजाचे सरदार या अबदाली व रोहिलियास उतम प्रकारे खराब करितील. मोठे युक्तीने सरदारांही बरी तजवीज केली असे माहाराजाचा विजय दक्षफेस आला व पूर्वी आज्ञा लिहिली होती की श्रीमंत रघुनाथराऊ दादासाहेबास हिंदुस्तानाकडे लोकर रवाना करितो. आता सहजच तिकडील काम तो मानसानुरूप जाले. आतां दादासाहेबाबा पोख्ता सामान व फौज व तोफखाना व फिरंगी जो सामान देवाचा तो देऊन पाठवावे, की ते आलियावरी राजश्री होळकर व सिंदे वगैरे मिलोन उतम प्रकारे पारपत्य अबदालीचे व रोहिलियाचे होईल. मोठा दीर्घ रोग अबदाली आहे. माहाराजे हिंदुस्थान व दक्षण या रोगापासोन सोडविलेले होईल. पन्नास लक्ष रुपये प्रतिवरशी माहाराज धर्म करिताती म्हणून येकतो. माझे मते जरी हा रोग माहाराजाचे हाते दूर जाला तरी त्याजपरीस शतगुणधर्म याजमध्ये आहे. येथार्थ आम्ही लिहिले आहे. आम्ही रात्रीदिवस हेच शुभचिंतन करितो. वरच्यावरी माहाराजास लिहावयाचे ते लिहितो. सर्वदा सरदारास जे तजवीज सुचते ते लिहितो. तेहि मान्य करून अखंड वर्तमान लिहितात. सारांश श्रीमंत दादासाहेब आलियावरी सर्व मिलोन पारपत्य करितील हे विनंती.
सेवेसी राव बदरीनाथराव सा नमस्कार.