Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 27.252: [Recd. 25-4-1760] Krishnarao Bhagwant Amatya seeks news from Baburao as Sadashivrao and Raghoba are reported to be going north to oppose the Abdali.

Selections from the Peshwa Daftar 27.252

Language
Marathi

27.252

पौ छ ८ रमजान

वैशाख सितैन

श्रीरामचंद्र

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री

बाबूराऊ स्वामी गोसावी यासी

पोष्य कृष्णराऊ भगवंत आमात्य कृतानेक नमस्कार विनंती उपरी. येथील कुशल जाणौन स्वकीय लेखन केले पाहिजे विशेष. बहुत दिवस आपणाकडून पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं यैसे नसावे. निरंतर पत्र पाठऊन कुशलोत्तर लेखनें संतोखवीत जावे. यानंतर राजश्री प्रधानपंत यांचा मुकाम नगरावरी होता. प्रस्तुत तेथून कूच करून पुढें गेले. राजश्री सदासिव पंडित

Bk Ca 11-31 व राजश्री रघुनाथ पंडित याणीं मोगलाकडील तहाचा मजकूर उरकून पुढें हिंदुस्थानांत जात आहेत. इराणी दिलीस येऊन राहिला. आलीकडे येणार येसें वर्तमान परस्पर यैकितों परंतु तत्त्वता कलत नाहीं. आपणाकडे बातमी वरचेवर येतच असेल तरी राजश्री प्रधानपंत याचा मुकाम कोठे आहे, येंदा छावणी त्या प्रांते होणार किंवा माघारे स्वस्थलास येणार, राजश्री भाऊ याजकडील मनसबा कैसा आहे, मोगलाचा तह कोणे प्रकारें जाहाला, इराणीकडील मजकूर कोणे प्रकारचा आहे हे सविस्तर लिहिलें पाहिजे. बहुत काये लिहिणे लोभ असो दीजे हे विनंती.