Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 27.253: [1750?] The Peshwa advises Sadashivrao how to dispose of the amounts received from Yashwantrao Pawar.

Selections from the Peshwa Daftar 27.253

Language
Marathi

27.253

श्री

पु॥ चिरंजीव राजश्री सदोबा यासी आसीर्वाद उपरी. राजश्री यशवंतराऊ पवार यांजकडे येक लक्ष अठावीस हजार रुपये येणे त्यापैकी अडसष्ट हजार शहरी, बतीस हजार नासिक़ास याप्रमाणे लाख रुपये वसूल आला. राजश्री बाबूजी नाईक याजकडील नारायणजी पुसत होते त्यास उतर दिल्हे की, खावंदाची आज्ञा येईल त्याप्रमाणे वर्तणूक करू म्हणून लिहिले ते कलले. ऐशास येथे खर्चाची वोढ यास्तव रूो येथेच पाठवणे म्हणून यशवंतराऊ पवार यास लिहून पाठविले होते परंतु पैका तिकडे येऊ न पावला. त्यास त्या यैवजावर विठल सिवदेव याची वरात रुपये ३०००० तीस हजार व चिमणाजी बापूजी रुपये २०००० वीस हजार येकूण पन्नास हजार रुपयाच्या दोन वराता केल्या आहेत तर सदरहू ऐवजापैकी दोही वरातांचे पन्नास हजार रुपये देऊन बाकी पन्नास हजार राहिले ते जमा करून ठेवणे. येथून वराता येतील त्याप्रमाणे देणे. दुसरीकडे येंकंदर पैका न देणे. नांयकाचा गुंता या रुपयाकडे काही राहिला नाही. मलहारबा रुपये त्यास जसे देणे तसे देतील. हे रुपये लिहिल्याप्रा पावंते वरातदारास लौकर करणे. नालबंदीचा ऐवज लोक येथे चाकरीवर यास्तव रुपयास विलंब न लावणे बहुत काय लिहीणे हे आसीर्वाद.

[+ येथून नानासाहेब पेशव्यांचें हस्ताक्षर.]

3742