Selections from the Peshwa Daftar 27.254: [12-5-1760] The Peshwa sends funds to the Bhau. It is clear that Bhausaheb was strictly controlled in his exactions by orders from the Peshwa.
Selections from the Peshwa Daftar 27.254
- Language
- Marathi
27.254
श्री
पु॥ चिरंजीव राजश्री सदाबा यासी आसीर्वाद उपरी. तुम्हास दोन लक्ष रुपये येथून पाठवावे येणेप्रमाणे.
५२६६० मल्हार कृष्ण यांजकडून
२५००० बा चंदेरी नि॥ कृष्णाजी नाईक रास्ते
२५००० प्रांत खांडवे नि॥ बापूजी मेघशाम
७२५०० कर्ज गु॥ लक्ष्मण शंकर
२४८९० गोविंद बलाल यांजकडील येकतालीसे हजारपैकी.
२०००००
येणेप्रमाणे दोन लक्षांचा भरणा करून पाठविला. त्याचा बयाज तुम्ही येणेप्रमाणे लिहिला. रुपये
२२५०० लक्ष्मण शंकर याजकडील येवजी वसूल
२५००० चंदेरी नि॥ कृष्णापा नाईक वसूल
२५००० प्रा॥ खांडवे नि॥ बापूजी मेघशाम वसूल
५२५०० मल्हार कृष्ण याजकडील येवजपैकी
१२५०००
येकून सवा लक्ष रुपये आले. लक्ष्मण शंकर याजकडील पन्नास हजार राहिले ते रोख येतां दिसत नाहीं. आठ पंधरा दिवस लागतील. तजविजे तजविजेने येतील ते घेऊं. मल्हार कृष्ण याजकडील दीडशे रुपये राहिले ते तेथें आपण घेतले पाहिजे म्हणून लिहिले. ऐसास
लक्ष्मण शंकर यांजकडील ऐवज इतक्या दिवसात येऊन चुकलाच असेल. तथापि न पावला ऐसे म्हणावे तर मारनिलैनी आपल्या गुमास्तियाची पत्रे आणून दाखविले त्यावरून ऐवज पावला ऐसे दिसते. त्याहीमध्यें पावला नसिला तर तो येवज पावेलच.
मल्हार कृष्ण याजकडील दीडशे रुपये येणे ते येथें घेतले. याचा मुबदला गोविंद बलाल यांजकडील येवजी सदरहू दीडशे तुम्ही घेणे.
गोविंद बलाल याजकडील येके-तालींस हजार पैकी चोवीस हजार
३743 गोविंद बलाल याजकडील येकेतालीस हजारपैकी येक पंचवीस हजाराची हुंडी व येक सोलाची यैशा दोन आल्या. त्यापैकी सोलाची फिरली. पंचविसाची सही होऊन पैका वसूल आला. बाकी सोला राहिले त्याचे गोविंद बलाल यास पुसोन काय वर्तमान ते लिहून पाठवावे. ऐशास पंचवीस हजार पावले बाकी सोला हजार राहिले. मारनिलेचे गुमास्ते वासुदेव सिवाजी येथे होते त्यास पुसिले. त्याणी सांगितले की फिरले हुंडीचा येवज मागेच करून पाठविला. इतके दिवसात पावलाच असेल यैसे सांगितले. तोहि यैवज येऊन पावलाच असेल. साडे आठशे दोन लक्षाचे भरण्यात तुम्ही येणे म्हणून पेशजी लिहिलेच आहे. त्याप्रा सदरहू रुपये तुम्ही घेणे.
येणेप्रमाणे दोन लक्षांचा भरणा जाला असे. छ २९ रमजान बहुत काये लिहिणे हे आसीर्वाद.
Discussed in (1)
- Fall of the Mughal Empire — Sarkar 1932, English