Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 27.84: [13-2-1754] Krishnaji Keshao informs Raghunathrao that his masters Krishnaji and Jiwaji Pawar have gone to meet Dattaji Sindia and that they could not proceed further with him as they had no definite instructions from the addressee.

Selections from the Peshwa Daftar 27.84

Language
Marathi

27.84

श्री

श्रीमंत महाराजधिराज राजमान्ये

राजश्री दादासाहेब साहेबांचे

सेवेसी

सेवक आज्ञाधारक कृष्णाजी केशव दिमत राजश्री जिवाजी पवार सा नमस्कार विनंती उपरी. येथील क्षेम जाणौन स्वकीये कुशल लेखकास आज्ञा केली पाहिजे (जे) विशेश. कृपावंत होऊन राजश्री कृष्णाजी पवार व जिवाजी पवार यांसी पत्र पाठविले ते छ २० माहे रबिलाखरी का। देवासियांत पावल. ऐसियासी येथील वर्तमान तर उभयेता यजमान स्वामीचे आज्ञेवरून देवासियांत मार्गप्रतीक्ष्या करीत होते कीं आज्ञापत्र येईल तेसमई देसास याव. त्यासी राजश्री दताजी सिंदे पाटील बाबा यांनीं आवंतिकेस भेटीस बोलाविले कीं समागमे चालणे. त्यास उत्तर दिधले कीं श्रीमंत साहेबाची आज्ञा आलियावेगळ येणे होणार नाहीं. त्याणी आग्रहो फारच केला तेव्हां मुकुंदबारीपावेतो जावे ऐसा करार केला. इतकियांत आज्ञापत्र त्यानी न आनविले तर फिरोन जाऊ ऐसा करार जालियावर तिकडे गेले. रोज वीस जाले. स्वामीच्या आज्ञापत्राची प्रतीक्ष्या केली याकरितां पाटीलबाबा पुढे गेले. सवेच मागून रा। यजमान आमचे उभयेतां मागून गेले. आतां आज्ञापत्र आले. हेहि तिकडे खाना करून. सरकारचा जासूद पुढे न जाये याकरितां येथून दुसऱ्या कासिदाबार रवाना करून. बहुत काये लिहिणे ? कृपा निरंतर आसो देणे हे विज्ञाप(ना) विनंती.

3602