Selections from the Peshwa Daftar 27.85: [3-6-1754] Holkar writes to Dada that the ex-emperor and his mother are kept in custody while the city celebrates the accession of the new ruler.
Selections from the Peshwa Daftar 27.85
- Language
- Marathi
27.85
श्रीसोरया
विनंती उपरी जुने पातशाहा व त्याची मातुश्री उभयता येके कोठडीत ठेविली. नवीन पातशाहा इजमुद्दीशा आलमगीर शानी तख्ती बसविले. शाहाने वाजिविले. त्याची दाही शहरात फिरविली. तमाम आमीर उमराव नजरा गुजराणिता. येणे प्रा येथील वर्तमान आहे. आपण येक्षश्वी आहेत. सर्व प्रकारे शहरात आपली कीर्त आहे. सीतळवख्त जाल्यानंतर कुतबा पढायासी जुमा मसीदीस येईल. फौजा आणविल्या होत्या त्यासी याउपरी न पाठवाव्या. श्रुत होये हे विज्ञापना.