Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 27.91: [1754] Trimbak Sadashiv Purandare to Sakharampant, announcing the visit of the Peshwa and Bhausaheb to Saswad and describing the entertainments given at the houses of Ganapatrao and Balwantrao Mehendale.

Selections from the Peshwa Daftar 27.91

Language
Marathi

27.91

[seal: श्री]

राजश्रिया विराजित राजमान राजश्री

सखारामपंत स्वामी गोसावी यासी

पोष्या त्रिंबक सदाशिव सा॥ नमस्कार विनंती उपरी. येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन केले पा॥ विशेष. तुम्ही पाच सात पत्रे पाठविली ती पावोोन बहुत संतोष जाहाला. त्याच प्रकारे आपले कुशल वृत निरंतर लिहीत जावे. तुमच्या पत्राची उत्तरे आम्ही दोन च्यार सविस्तर लिहून पाठविली होतीं. पावली न पावली न कळे. परंतु चिरंजिवाचे लग्नाचे मुजीचे वगैरे सविस्तर लिहिले होते. सांप्रत वर्तमान तर तीर्थरूप राजश्री नाना व राजश्री भाऊ स्वामी सासवडास आले होते. दोन दिवस होते. आमचे घरी व गणपतरायाचे घरी व बळवंतरायाचे घरी भोजने जाहाली. सिष्टाचार होणे तो जाहाला. त्याउपरी सोनोरीस खंडोपंत पानश्याचे घरी श्रीमंत जाऊन थेवरास दर्शन करून पुण्यात आले. आम्ही बाच आलो. तीर्थरूप बाबा आपा मागाहून आले. प्रस्तुत सारे पुण्यातच आहो. कळले पाहिजे. तीर्थरूप राजश्री भाऊनी तुम्हास दोन तीन पत्रे पाठविली त्याचे उतर पाठविले नाही म्हणून बोलत होते. यैश्यास तुम्हास पत्र पावल्यावर उतर न पाठवावेसे काय आहे. यैश्यास पत्र पावले न पावले लिहिणे व विनंतीपत्र हमेशा लिहीत जावे. खावंद कृपा करून स्मरण तुमचे करतात आणि तुमचे पत्र येत नाही याजवरून तुम्हास काय म्हणावे ? याउपर सदैव विनंतीपत्रे लिहीत जाणे. श्रीमंताची व मल्हारबाची भेटी जाहालियाचे वर्तमानाचे पत्र लिहिले ते कलले. याउपर नवलविशेष लिहीत जावे. बहुत काय लिहिणे ? लोभ असो दीजे हे विनंती. पो। बळवंतराऊ गणपत नमस्कार. पत्रे पाच सात आम्ही पाा; परंतु उत्तर येक न आले यैसे न करावे. बहुत काये लिहिणे ? लोभ कीजे हे विनंती.