Selections from the Peshwa Daftar 27.92: [1754?] The letter, neither the writer nor the addressee of which can be identified, appears to refer to differences among Maratha generals on the occasion of the capture of Delhi. Some of them, it appears from that letter, advocate a policy of direct action, independent of the Vazir's interference.
Selections from the Peshwa Daftar 27.92
- Language
- Marathi
27.92
(श्री)
सेवेसी विज्ञापना. चिठी तात्याचे समक्ष लिहिली व पुढेंहि ल्याहावे लागेल ते त्यांचे समक्ष. यास्तव निराळे कासीद दोन च्यार जोडे जरूर पाठवावे. नागरमलाचे घरीं सेटिबाचे लोक होते ते वजिराचे लोकानी मारले धरले म्हणून सिटिबा व सुभेदार फार श्रमी आहेत. रुपयाची निशा व शहरात माणसे पाठवावी हे काही होत नाहीं. तालकटोरियावर याची व आपली फौज उतरलियावर खानखाना येईल. तोच आला म्हणजे सर्व निशा होईल ऐसे म्हणतात. सारांश शुध बिघाड करावा ऐसा तोच यांचा भाव दिसतो. दुसरे म्हणतात की आपली आज्ञा आम्हास आहे कीं, शुक्रवार, शनवार तुम्ही वाट पाहाणे. रविवारी आम्ही लिहू त्याप्रमाणे करणे म्हणूनहि म्हणतात. त्यास आपण काये संकेत सांगितला असेल तो न कले. वरकड
3607 दुराभिमान हाच कीं बिघाड करावा. खानखाना, नागरमल येतील; मग रुपयांची निशा करून घेऊं, अगोधर होत नाही. जर वजीर खामखा आपले लोकांसी अथवा वकिलासी लबाडी करील तर बिघाड सहजच जाला; मग जी जलदी करणे ते आपणच करावी. येथे विनाबिघाड दुसरा विचार नाही. मग रुपये येत अथवा न येत हा विचार नाही. पत्र चोरून मार्गी लिहिले आहे; तर दिलीचा डौल पाहून जे उत्तम ते करावे व कासीद जोडे आम्हाकडे पाठवावे. आज सांईकाळ रात्रीपर्यंत उत्तर ल्याहावे; त्यासारिखे यांचे उदईंक कूच अथवा मुकाम करूं. उगेच माघारे फिरावें, बिगाड करावा ये गोष्टीस फार राजी आहेत. निशा शहरांतील होत नाही ऐसा मजकूर आहे. जे उत्तर लिहिणे ते आजच ल्याहावें. प्रतीक्षा आहे हे विज्ञापना.