Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 29.10: [Recd. 2-7-1761] Balaji Govind reports the movements of Najibkhan, the Jat, Holkar and Rohilla chiefs in the North. The letter also refers to disturbances in Bundelkhand and the Doab.

Selections from the Peshwa Daftar 29.10

Language
Marathi

29.10

छ २८ जिल्‍काद इसने

श्री

पु॥ श्रीमंत राजश्री पंत प्रधान स्‍वामीचे सेवेसी

विज्ञापना. सकुराबादॆस रोहिल्‍याची फौज दाखल जाली. त्‍यांचे बल विशेष आहे. नजीबखान दिलीहून बाहीर निघणार. आगरेयास जाटानें मोर्चे लाविले. सबब दिलीहून साहजादे यास बाहीर काढून हंगामा करावा हा हेत त्‍याचा आहे. जाटासी पेच आहे. गाजुदीखान जाटाजवळ आहे. रोहिले दंगा करावया तयार आहेत. राजश्री गंगाधरपंत तात्‍यांस आम्‍ही लिहिले आहे. त्‍याजकडून काही सळुखाचा प्रकार सुरजमल याचे विद्यमाने जाला तर उतम ; नाही तर सकुराबादेचे ठाणे त्‍याचे बसले. पुढेहि यावयाचा विचार करितील. हाफीज रहिमत वगैरे अलीकडे उतरणार. ते उतरल्‍यावर भारी होईल. आम्‍ही सकुराबादेच्‍या मोहोरावर फौज रवाना केली आहे. मागाहून होईल ते सेवेसी लिहून पाठऊं. सागर प्रांती जमिदारानी मोठा हंगामा करून हटयास मोर्चे लाविले. तमाम ठाणी दमोई तेजगड राहिली बसविली. आम्‍हास अंतरवेदेचे शहामुलें फौज तिकडे पाठविता नये. राजे प्रीथिसिंग याणीहि बदनियत करून दुंडी केली. सागरास मोर्चे लावावयाचा विचार आरंभिला. तेव्‍हा राजश्री जानोजी भोसले यांस सागर प्रांती आणिले आणि हटयाचे मोर्चे उठविले. जमीदारांचेंहि पारपत्‍य केलें तों

4130 राजश्री मल्हारजीबावा रामपुऱ्याकडे लांबले; व राजश्री जानोजीबावाहि नागपुराकडे जाऊं लागले. तेव्हां बुंदेल्यासी कललें त्या रितिने सळख केला. राजे प्रीथिसिंग यांसह्रि तूर्त मायेत घेतले. जाणोजीबावा जाणार यामुळे तेजगड अभान वगैरे ठाणीं येणार नाहींत. झासीकडेहि गुजरानी दंगा आरंभिला आहे. चौकडे दंगाच तूर्त दिसतो. या प्रांती फौज मातबर येईल त्याचा बंदोबस्त होईल. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.