Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 29.11: [2-7-1761] Gundo Kashi writes to Dadasaheb from Shrigonda describing an interview between Abaji Mahadev and Nimbabai Sindia who did not accept the proposal regarding Mahadaji Sindia's succession but promised to raise a larger force on the return of Sabaji and Chintoba from the North. The letter incidentally re

Selections from the Peshwa Daftar 29.11

Language
Marathi

29.11

छ १ जिल्हेंज इसने

श्रीमंत माहाराज राजश्री दादासाहेब

स्वामीचे सेवेसी

विनंती सेवक आज्ञाधारक गुंडो कौंसी मु॥ श्रीगोंदे चरणावर मस्तक ठेऊन सा नमस्कार विज्ञाति. येथील वर्तमान ता॥ छ २८ माहे जिल्कादपावेतो साहेबाच्या कृपावलोकणेकरून यथास्थित असें विशेष. छ २९ माहे जिल्काद साहेबाकडून राजश्री आबाजी महादेव येऊन संध्याकाली दाखल जाले. राजश्री बळवंतराव गोपाल याची भेट घेतली. छ २७ माहे जिल्काद प्राथकाली निंबाबाईचे भेटीस गेले. भेट जालियावर साहेबाच्या आज्ञेप्रमाणें निंबाबाईसी बोलले. वर्तमान ऐकताच निंबाबाई रागास आली. राजश्री नारोबा सेनवाई दिवान याच्या वाडियावर चौकी पाठविली; सबब जे तुम्हीच सरकारात कुषमांडे करीता, हा विचार ध्यानास आणून रागास आली. संध्याकाली राजश्री आबाजी महादेव याजला निंबाबाईनी बोलाऊन बोलले जे आमचे अकारीक रा॥ साबाजी सिंदे व चिंतोबा जैसे हिंदुस्थान प्रांतात आहेत. ते चाकरीवर आहेत. ते आलियावर पुढें आनखी फौज ठेवणे ते ठेविली जाईल; परंतु माहादाजी सिंदे याचे अनुकूल पडत नाहीं जैसे पष्ट बोलली. रा॥ आबाजी महादेव याजला पागोटे १ व सेला १ जैसी वस्त्रें २ देऊन रुकशत केले. सेवेसी श्रुत होय छ २८ माहे जिल्काद. राजश्री जाणूजी निंबालकर यानी बरंकदाज ३०० तीनसे श्रीगोंदियासी

[१ शिंद्यांचा कारकून, श्रीगोंद्यास.]

Ca 73—2 बंदोबस्तीस मदत पाठविले होतें ते तीन दिवस होतें चौथे रोजी मागारे गेले. जे वेलेस अगत्य लागेल ते वेलेस मागती येणार आहेत. छ २६ माहे जिल्काद. उजनीहून राजश्री चिंतोबा याचा पुत्र श्रीगोंदियासी आले. राजश्री जणकोजी सिंदे जिवंत आहेत म्हणोन वार्ता मात्र सांगतात. राजश्री जाणूजी निंबालकर करमालियाहून रातोरात पुण्यास साहेबाच्या भेटीस येऊन मागारे गेले, यैसी वार्ता श्रीगोंदियात बहुतसी आहे. सेवेसी श्रुत होये हे विज्ञापना.