Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 29.9: [1-7-1761] Sadashiv Khanderao congratulates one Mahipatrao on his safe return from Panipat and expresses a desire to meet him.

Selections from the Peshwa Daftar 29.9

Language
Marathi

29.9

पै॥ छ ९ मोहरम श्रावण

श्री

श्रीमंत राजश्री महिपतराऊ दादा स्वामी गोसावी

यासी

श्रो सदाशिव खंडेराव आसीर्वाद विनंती उपरी. येथील क्षेम ता॥ छ २७ जिलकाद पावेतो आपले कृपेकरून अमदाबादस कुशलरूप असो विशष. बहुत दिवस स्वामीकडील वर्तमान कलत नाही. तेणेकरून चित उद्विग्न आसे. तर यैसे न पाहिजे. सदोदित आलिया वार्तिकासमवेत कृपापत्र पाठऊन चितास आनंदवीत व सांभाळीत असिले पाहिजे. यानंतर आपण व श्रीमंत राजश्री नाना व सर्व मंडळी हिंदुस्थानातून सौ॥ पार्वतीबाई समवेत स्वास्तिक्षेम आला हे वर्तमान श्रीमंत राजश्री नानानी आम्हास पत्र लिहिले त्यात मजकूर लिहिला तो वाचून परम आनंद जाहाला. आपले भेटीचा लाभ घ्यावा हा हेत बहुत आहे. परंतु ह्या प्रांती दंगा यंदा हिंदुस्‍तानचे हगामाकरिता जाला तो आपल्‍यासी व श्रीमंत राजश्री नानास पूर्वी पत्री मजकूर लिहिला होता त्‍याजवरून सर्व वर्तमान अवगत जाले असेल तेच वर्तमान अद्यापिपर्यंत आहे. काहीसे जाले म्‍हणोन येता न ये येथेहि करून येऊ परंतु राजश्री आपाजी गणेश सुभेदार येऊ देणार नाहीत. बरे जे दिवशी भेटी होईल तो दिवस सुदिन असे. आम्‍ही पदरचे असो. सदोदित कृपापत्री सनाथ सांभाल करीत जावा. विदित असे. वरकड वर्तमान श्रीमंत राजश्री नानाचे पत्रावरून सर्व अभिप्राये श्रवण होईल. पत्राचें प्रत्‍योत्तर पाठवणें. आपले कुशलतेचें व दरबारी राजकी नवल कीं हिंदुस्‍थानांतील वगैरे सर्व वर्तमान तपसीलवार लिहिलें पाहिजे. बहुत काये लिहिणें. कृपा लोभ असो दिल्‍हा पाहिजे हे विनंती.

[१ महत्त्व, दबाव.]