Selections from the Peshwa Daftar 29.99: [11-11-1765?] Ramchandra Tukdev sends his daily report from Jaipur, about events in various places.
Selections from the Peshwa Daftar 29.99
- Language
- Marathi
29.99
श्री
रामचंद्र तुकदेव जयनगर कार्तिक वा १३ रोज (गु॥)
पादशानी डेरे बाहेर दिल्हे. सुज्यातदौले अयोध्येहून आल्यावर ते व अमदखान वगैरे एकत्र होऊन अगरियास येणार. १
दिलीत पादशाहाजादा व जाबतेखान रोहिले आहेत. १
अनरूधसिंगाचा भाऊ रतनसिंग कानोडेस आहे. त्यानें रोहिल्याकडे पैगाम लाविला सबब माधोसिंगानें बक्षी वगैरे रवाना केले की त्यास तंबी देणे. नोकर सरकारचा पैगोम लावीत फिरतो. सा १
सीख सरहंदहून पुढे आले. कांही बुढ्या सारंगपुराकडे उतरले. जोहरमल जाट व सिख एक होणार. पैगाम आहे. १
फरासिसानें कलकता व मक्सुदाबाद घेतली. रोहितास गडास कजिया पडला आहे तो गड घेऊन काशीस येणार. इंग्रजावर दबाव पडला आहे. १
नजीबखान दहा हजारानसी हसीहसाराकडे येऊन भोवानी शहर मारिले. प्रस्तुत तेथेच आहे. नारनालेकडे दबाव दिल्हा आहे. मुलकाची खंडणी करितो सबब सिखाचा कजिया होणार. ते भारी आहेत भटनेरचा राजा व आला जाटाचे पुत्र रोहिल्याकडे येणार. १
माधोसिंग तरतूद करितात. चतूर (?) बोलाविले आहेत. १
अच्युतराव याणी उदेपूरची मामलत विल्हेस लाऊन पुढें आले आहेत हजरीस येणार. जोतपूरची मामलत करारात आणून विजेसिंगाकडील निकाल जाला तर उत्तम नाहीं तर मारवाडांत धूम करणार. १
[१ मुशिदाबाद. २ बोलणें, सूत्र.]
माधोसिंगाकडेहि पत्रें पाठविलीं कीं बाकीचा ऐवज देणें; नाहीतर धूम करितों. त्याणी उत्तर लिहिले कीं सुभेदाराकडे समजावणे. १
रहिमतखां तुमतीजी (?) नवाब दाऊदखां पा। जाफराबाद येथें अडीच गांव दोन हजार तनरख्याचे आहेत. थोडा आबाद, बाकी उज्याड असे. १
खेडियाचा ऐवज चौथाई बाबती सरदेशमुखी मात्र करून सनद् बक्षीस कीजे. १
रांडा वगैरे पाचसे माणूस उपासी मरते, ते दुवा उपर दराजी करितील (?) १
आपले वडिलांनी आमचे वडिलांचे नावावर चालविले. हालीहि बुजेंरगाचे नावावर नजर देऊन चालविले पाहिजे.
Discussed in (1)
- Fall of the Mughal Empire — Sarkar 1932, English