Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 29.103: [1765?] Vithal Shivdev requests Moropant Dada Phadnis to tender sincere advice to the Peshwa on the grave situation in the North.

Selections from the Peshwa Daftar 29.103

Language
Marathi

29.103

श्री

राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री

मोरोपंत दादा स्वामीचे शेवेसी

पोष्य विठ्ठलराव सिवदेव कृतानेक साष्टांग नमस्कार विनंती उपरी. येथील कुशल जाणून स्वकीये कुशल लेखन केले पाहिजे विशेष. इकडील वर्तमान श्रीमंताचे पत्रीं लिहिले आहे त्यावरून ध्यानास येईल त्याप्रमाणें पुढील तरतूद हिंदुस्‍तान राहे ते करावे. नाहीतर सर्व घेतला मुलुक जाऊन माळवा राहाणे कठिण जाले आहे. याची पैरवी श्रीमंतास सांगून करवावी. आम्ही सर्व प्रकारें आपले आहो. विस्तार ल्याहावा जैसे नाही. विशेष काये लिहिणे कृपा असो दीजे हे विनंती.