Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 29.104: [1765] The writer assures Raghunathrao (?) to place confidence in Mahadaji Sindia and Holkar whose loyalty, he says, is above suspicion.

Selections from the Peshwa Daftar 29.104

Language
Marathi

29.104

पु॥ र

(पहिला बंद गहाळ.)

पंचवीस हजार रुपये सरकाराचे कारकुनाचे हवाला केले. बाकी पंच्याहत्तर हजार विसा दिवसानीं सरकारचे कारकुनाचे पदरीं पडतील व दोन लक्षाच्या हुंडी जलदीने येतात. अवरंगाबादेच्या जाल्या आहेत. तो येवज आनंदवलीस पावता करवावा. आम्हीं त्रिवर्ग मजलदरमजल जाऊन सुभेदारांची व महादजी सिंदियाची भेट घेऊन येतो. गुंता नाही. हे वर्तमान जुजाचे लिहिले हे येकून हजूरची मंडळी लटकेच म्हणोन नानाप्रकारचा मजकूर समजावितील इतराजी स्वामी करतील यामुळे दुरुखा शह सरदारावर पडतो. तिकडून परचक्राचे जुज इकडून इतराजी खावंदाची त्यास पुढे नक्षाचा कोण ? पूर्ण ईश्वरी क्षोभ तर येसे न करावे. या सरदारावर कृपा करावी. परचक्राकडून कल्यान इछावे याजमध्ये नक्ष खावंदाचा असे. सुभेदाराकडून किमपि तिलमात्र लक्षात अंतर नाहीं व माहादजी सिंदियाचे लक्ष पूर्ण रक्षावे हेच सुभेदार वडीलपण बोध करीतात. अनमानहि नाही. जलदीने खासा स्वारी कुमकेस यावे तो अर्थ खावंद करनार. रो नारोशंकराचा प्रकार व सर्व वर्तमान रा॥ विष्णुपंत बाबाजी व रा॥ अन्याबानीं विनंतीपत्रे लिहिली आहेत त्यावरून श्रुत होईल. कृपा करनार स्वामी समर्थ आहेत हे विज्ञात.

4225