Selections from the Peshwa Daftar 29.105: [December 1765] Ramchandra Tukdev's letter referring to a battle between Jawahirmal Jat and Madhosing in which Maratha aid was solicited by Madhosing.
Selections from the Peshwa Daftar 29.105
- Language
- Marathi
29.105
आंमचा मुलूक खराब होतो त्याजवरून राजश्री सुभेदारसाहेब यानी बहुत समाधानपूर्वक खातरजमा केली आम्ही इकडून जाटाचा मुलूक मारितो. फौजा रवाना केल्या. राजश्री अच्युतराव गणेश व खानाजी जाधव आठ दाहा हजार फौज किसनगडासनिध धूम करून होते. त्यासी ताकीद वरचेवरी पाठविली कीं तुम्हीं जलद् राजे माधोसिंगजी याचे फौजेस सामील होऊन बंदोबस्त राखावा. त्याजवरून अचुतराव गणेश यानी खानाजी जाधव यासी मारवाडचे सरदेवरी ठेऊन आपण याच्या साहित्यास दरमजल इकडे आले. इकडील दबांव भारी देखो(न) जोहरमल जाठ यानी आपला वकील (फाटले) देऊन राज्याकडे पाठविले * * * जाली राजे हरसाहे व ठाकूर राजसिंगजी * * * * माने जाबसाल स्नेहवाद संपादन नवल * * * * खावत यासी घेऊन जाटाकडे गेले दबाव उत्तम प्रकारे देखोने जोहरमल जाट यानी रुरुचे सीख माघारे बिदा केले. आपण कांही फौज पाच सात हजार समागमे घेऊन कुंभेरीस गेले. गुरुचे सीख आपल्या मुलकास गेले. नवलसिंग याचे विद्यमाने कारभार विल्हे लागला. राजे माधोसिंगजी याची फौज कानौड नजीक मुकाम करून आहे. येथहि नगदी फौज ठेवावयाचा विचार जाला होता. राजश्री अच्युतरावजी फौजसहवर्तमान फागाई सनिध आले होते. त्यासी सीख माघारे गेले. त्याजवरून ठाकूर राजसिंगजी याजबराबर हथी, घोडे, सिरपाव, जवाहीर, रकम सिस्टाचार काही मेजमानी पाठविली. तेथूनच सिस्टाचार करून माघारे वाटे लाविले. पुढे भेटीस बोलाविले होते परंतु लस्कर अनिवार, मुलुकात धूम करीत रवी चारितात त्याजवरून तेथून निरोप देऊ(न) मार्गस्त केले. ते अच्युतरावजी टोकेसनिध होऊन इंद्रगडाकडे गेले. करोलीहोऊन राजश्री पाटीलबावास सामील होतील. राजश्री सुभेदार साहेब व पाटीलबाबा फौजासहवर्तमान ग्वालेरीपलीकड पंधरा विसा कोसावरी आहेत. गोहदच्या गढ्या च्यार पाच घेतल्या. फौजा सध्या आगऱ्यापरियेंत धूम करितात. मुलूक मारितात. जाटाचा मुलूक खालशा करावा. नाहरसिं(ग) याचे साहित्य उत्तम प्रकारे करून त्या * * * * * * बस्त करून * * * * विचार आहे. चमेल उतरोन * * * * * फौजसहवर्तमान सुरजेकडून आलीकड * * * * सत्वर फौजेस सामील होणार. त्याच्या राजश्री सुभेदारसाहेब याच्या भेटी जाल्यावरी सविस्तर अर्थ लिहीत आसो. जाठ जाहरमल आपल्या जागा तरतूद करीत असे. फौजा ढवलपुराकडे पाठविल्या आहेत. आगरियाचा बंदोबस्त केला. इकडे आपल्या मुलुकात फिसाद पडत याजकरिता माघारे इकडून गेला. पुढे काय तरतूद अर्थ ध्यानास येईल ते सविस्तर साहेबाचे सेवेसी लिहीत असो. राजे माधोसिंगजी याच्या मुलुकात बहुत वखेड़ा गुरूच्या सिखाचा पडला होता. साहेबाचे प्रतापे करून प्रस्तुत दूर जाला वरकड (अपूर्ण)
[+ पत्र रामचंद्र तुकदेव यांचें.]