Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 29.106: [1765 ?] The note refers to an assault on a fort in Malwa.

Selections from the Peshwa Daftar 29.106

Language
Marathi

29.106

श्री

सेवेसी विज्ञापना. काल आज्ञा जाली त्याप्रा॥ विस्वासराऊ लक्ष्मणविठल सिवदेव यांचे गोटास गेले. तेथून कारकून मध्यस्त किल्ल्यात गेले. त्याचे जाबसालाकरिता मार्गप्रतीक्षा केली. अद्याप जाबसाल आला नाही. परभारी हल्ला करावा तरी बेमानी दिसेल यास्तव करतां नये म्हणून हल्ला आजचा दिवस राहिली. मुहुर्ताचा समयहि टळला. याउपरहि जैसी मर्जी असेल तैसे स्वामीचे आज्ञेप्रा॥ होईल. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.