Selections from the Peshwa Daftar 29.12: [12-5-1761] Gopal Keshav, from Bhander in the province of Jhansi, writes to the Peshwa news about the Jats and other petty chieftains who have turned rebellious and are creating trouble.
Selections from the Peshwa Daftar 29.12
- Language
- Marathi
29.12
छ २४ जिल्काद इसने सितैन
श्रीमंत राजश्री पंतप्रधान स्वामीचे सेवेसी
विनंती. सेवक गोपाल केशव कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना. येथील वर्तमान ता॥ छ ६ माहे शवल मुकाम भांडेर प्रांत झासीं राजश्री बाबूराऊ कोनेर याजसमागमे आपल्या प्रतापेंकरून सेवकाचे वृत्त यथास्थित असें विशेष. पा॥ उचडचे वृत्त सेवेसी विनंती लिहिली होती. आज्ञापत्र सादर जाले कीं राजश्री मल्हारराऊ सुभेदार व राजश्री नाना पुरंदरे याजला निवेदन करणे, ते सांगतील त्याप्रमाणें वर्तणूक करणें. आज्ञेप्रमाणें उभयेतांचे सेवेसी आपाजी मैराल कारकून पाठविला. महिना दीडमहिना समागमें राहिले. सर्व सरदारांस पा॥ मजकुरचे वर्तमान सांगितले कीं दुसाला मिळून कमजाद तीन लक्ष रु॥ घेणे. त्यापैकीं पाऊण लक्ष रु॥ वसूल, सवादोन लक्ष हमी घेणें. जमीदार दरोबस्त बदलले आहेत. पैसा देत नाहींत. पारपत्य करावे अगर दोन हजार फौज द्यावी; परंतु कांहीं केल्यानें दोनी विचार घडून न आले. प्रस्तुत तों फौजा देशास गेल्या. सालबाईचे ठाणे राजश्री विठ्ठलरायानी नरवरकरास दिले. त्यावरून पछोरकर जाट गोहदेंसी बलजू जाटाकडे गेला. उचडकरहि दरोबस्त बलजू जाटानें बोलावून नेले. सर्व जाट एकत्र जाले आहेत. दत्तियेकरासी व नरवरकरासी बिघाड करणार. आजीपर्यंत उचड परगण्यांत भरोलीस गढी आहे, ते जतन केली आहे. दोनसे माणूस व सरंजाम पोख्त केला आहे. कसबियांत माझे व सिलेदार मिळून संभर राऊत सेदिडसे माणूस ठेविले आहे. याउपर कसे ठरतील ते पाहवे. झासीस कर्जे घेऊन त्याजला खर्चास देतो. कोण्या गावास माणूस जाऊ पावत नाहीं. साल मजकूरची रसद दिल्लीस नेऊन दिली. त्यापैकीं येक रुपया प्राप्त नाहीं. याप्रमाणे वर्तमान आहे. पुढे आज्ञा येईल त्याप्रमाणे वर्तणूक केली जाईल. राजश्री गोपालराऊ बापूजी झासींच्या मदतीस आले होते. येक मास जाला तो आहिरानी आहिरवाडा पूर्वींच हस्तगत केलाच आहे. गढाउडिरा दोन किले पूर्वी सरकारात होते ते राजश्री गबो गोविंद यानी पाडले. प्रस्तुत तेथे आहिर जाऊन बसले आणि किले बांधितात आणि गोपालरायाकडील भोरासे वगैरे माहाल आहेत तेथे आहिरानी धामधूम करून गढ्या घेतल्या. राहिल्या त्यास मोरचे लाविले आहेत, यास्तव हे कूच करून त्या प्रांतास गेले. झासी प्रांती बोडसेकराचा वगैरे रजवाडियाचा दंगा बहुत आहे. कांहीं फौज या प्रांतास छावनीस राहिली असती तर इतका दंगा न होता. आपल्या प्रतापेंकरून होईल ते खरे. विशेष काय लिहिणे हे विज्ञाप्ति.