Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 29.13: [24-8-1761] The writer states, inter alia, that Shuja-ud-daula along with the Shah-zada has left Bengal with the intention of marching on Delhi, but opines that he will not reach his objective.

Selections from the Peshwa Daftar 29.13

Language
Marathi

29.13

छ २३ मोहरम

इसने.

श्री

शेवेसी भगवंत विष्णु विज्ञापना येसीजे. वारानसीहून साहुकारियात पत्र आले की सुजायेतदवळा शाहजादियास बंगालियातून घेऊन जेष्ठ वद्य सप्तमीस कासीस दाखल जाले. तेथून कूच दरकूच दिल्लीस जाणार आहेत; परंतु त्याचे मनसबे सिधीस जानार नाहीत. माहाराजास मुलूक काबल खंदारपर्यंत श्रीजीने दिधला आहे; परंतु त्याची वर्म समजल्यास सर्व मनसबे सिधीस जातील. माहराज म्हणतील की ती वर्में कोनती तर जेव्हां ब्राम्हनाचे राज्ये जाले तेव्हा सहजच सत्ययुग लागले. जेथपरियेंत कलयुगचा संचार आहे तेथपरियंत ब्राह्मनाचे राज्य आहे; परंतु थोडकेशे राज्ये श्रीमंताणी सोडविले. परंतु जितके राज्ये सोडविले तितकियाचा बंदोबस्त सत्ययुगाचे धर्माप्रमाणे जाला नाही. याजकरिता पुरता मुलुक सर जाला नाही. स्वामी म्हणतील की सत्ययुगचे धर्म कोनते त्याचा विस्तार लिहिल्यात येत नाही. माहाराजाचेहि संगृही कोन्ही तत्वव्येत असतील त्याचे विचारे वर्तणूक जालियास सर्व मुलुक सर होऊन माहाराजाचे मनोदयानरूप मनसबे सिधीस जातील. स्वामी म्हणतील की तत्वव्यता काशावरून जानावा, त्याची वळख कैसी जानावी; तर तत्वव्यत्याची परीक्षा ऐसी आहे की ज्या दंडदीपाच्या आष्ट दिशा आंहेत तेथे जे दिशेची मोहीम योजून आल्यास तिकडे त्याचे विचारे पाठऊन ज्यास सांगितले त्याची उभारनी करून सत्वर रवाना करावे. तिकडील बंदोबस्त जालियावर ज्या ज्या दिशेची मोहीम योजून आल्यास त्याचे विचारेच पाठऊन अष्ट दिशेचा बंदोबस्त करून जे दिशेचा बंदोबस्त जाला तेच दिशेस सतयुगाचे धर्माप्रमाणे मर्यादा बांधोन दुसरी दिशा सर करावी याचे प्रमाणे मुलुक सर जालियास त्याचप्रमाणे सतयुगचे धर्म चालवावे. ऐसे जालियावर सर्व बंदोबस्त आपले मनोदयानरूप घडोन येईल. या दिशेची मोहीम योजून आल्यास सेवकासहि लिहून पाठविले पाहिजे. स्वामीचे अन्नाचे प्रतापे जो मनसबा सुचल तैसे लिहून सेवसी पाठऊन. रो जानोजी भोसले सेनासाहेब सुभा त्याचे बातमीचे वर्तमान येथून कोन्ही मातबर माणूस व वकील येसे माहाराजाचे सेवेसी पाठविणार आहेत. येथील विचार आपले आज्ञेविरहित नाहीत. परंतु सरदारी येथील वोढगस्त आहे. परंतु याचे निष्ठेत सांप्रत तर काही आंतर आपले ठाई नाही. याचे हते कितेक बंदोबस्त सिधीस जातील. आपनहि सर्वजान आहेत. मायेत घेतील. आम्ही सेवक लोकानी ल्याहावेसे नाही. बहुत विस्तार करोन लिहिला म्हनऊन सेवकावर विश्याद न करावा. सेवसी विज्ञाति.