Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 29.14: [15-10-1761] Disturbances in Bundelkhand are reported to Vishvasrao Lakshman and immediate succour is solicited in order to nip the trouble in the bud.

Selections from the Peshwa Daftar 29.14

Language
Marathi

29.14

पो छ १६ रबिलावल

श्रीगजानन

श्रीमंत राजश्री रावसाहेब

स्वामीचे सेवेसी

आज्ञांकित त्रिंबक विश्वनाथ कृतानेक साष्टांग नमस्कार विनंती. येथील क्षेम तागाईत छ १६ माहे रबिलावल जाणोन स्वकुशल लेखन करीत गेले पाहिजे विशेष. इकडील वर्तमान तर रावराजे यांचा मुकाम आज सागरीं केला आहे. यांची नजर ठिकाणीं नाहीं, पजनसिंग वगैरे याची भेट येथेंच होणार. आपले तालुकियाचे गांवगना चिठ्या केल्या आहेत. कोणा गावास शंभर कोणा गांवास दोनसें याप्रमाणें आहे. यांचा मनसुबा कीं आवघे भाऊबंद येके ठिकाणी जाले म्हणजे सागरी ठाणें बसवावें. याप्रमाणें वर्तमान आहे. तर पत्र पावतांच यांजला सरकारांतून येकपत्र रावराजे यांस व येक पत्र राजश्री तीर्थाजीपंत यास लिहावें की, तुम्ही सागरीं मुकाम केला तर हे गोष्ट कार्याची नाहीं ऐसें यांस पत्र सत्वर पाठवावें. नाही तर आम्हीं याजला येथून उठऊन देतों. परंतु आपली आज्ञा व उभयेतांस येक पत्र ऐसें सत्वर पाठवावें. पुढें जमाव जालिया मग कठिण. यास्तव विनंती लिहिली जाते. व राजश्री चिमणाजी मोरेश्वरहि आपले जवळच आहेत त्यासहि सत्वर महूस रवाना करावें. यांचा मनसुबा विपरीत दिसतो. येकायेकींच सागरास खरगापुरीहून दोन दिवसांत आले व ठहरोलीकरांचे भाऊबंद प्राणसिंग विजनावाले तेहि समागमें आहेत. आज येथून पत्रें टहरोलीस व चिरगांवास गेलीं कीं तुम्हीं सागरीं भेटावयास येणें. त्यास यांस पत्र सत्वर पाठवावें व चिमणाजीपंताची लवकर रवानगी करावी. यांची भीडभाड जमाव थोडकाच आहे. तर येवडियांतच यांचें पारपत्य करावें. हे मोठे भले माणूस आहे. भीड जमाव जालिया आटोपणार नाहींत यास्तव आज्ञा लिहितों. पत्रोत्तर सत्वर पाठवावें. रातोरात जाबसाल देविला पाहिजे. बहुत काय लिहिणें? गढीचा बंदोबस्त यथास्थित आहे. गढीची चिंता न करावी. विनंती सेवेसी श्रुत होय हे विज्ञप्ति.