Selections from the Peshwa Daftar 29.15: [18-10-1761] Immediate help is requisitioned to put down disturbances in Bundelkhand.
Selections from the Peshwa Daftar 29.15
- Language
- Marathi
29.15
पो॥ छ १९ रावल
श्रीगजानन
श्रीमंत राजश्री रावसाहेब
स्वामींचे सेवेसी
आज्ञांकित त्रिंबक विश्वनाथ कृतानेक साष्टांग नमस्कार विनंती. येथील क्षेम तागाईत छ १९ माहे रावल मुकाम ठाणें सागर स्वामीचे प्रतापे सुखरूप असों विशेष. इकडील वर्तमान तर रावराजे व तीर्थराजपंत आज कूच करून येथून जाणार. तीर्थराजपंत तर बोंडशास जातात व राजे राव सुजानपूर बोंडशानजीक सतारा येथें कूच करून जातात. त्यास माहाराजाचे पुण्येंकरून याजला साफ सांगितलें कीं सागरीहून कूच करून जाणे. नाहीं तरी तुम्हांसी व झासीहून स्वार आलेत त्यांसी कजिया होईल. त्यास त्यानी विनंती केली कीं आम्हीं येथून जातों. येथें राहात नाहीं. त्यास ते आज येथून कूच करून जातात. हे गेलिया आज्ञा होईल तर ब्राम्हगुण्याच्या तालुक्यांत ठहरोलीकराचीं माणसें गांवगना बसलीं आहेत, आज्ञा होईल तर तिकडे जाऊन उठऊन देऊं व किर(कोळ) बुंधेल आहेत याचे पारपत्ये थोडक्यांतच होईल. याची काये आज्ञा ते करावी व धमणावाले ठाकूर यानी आमचा गांव मौजे चपलोटा दरोबस्त लुटून पस्त केला. आणखी जमाव म्हणावा तर दाहा तुबका जमा आहे यास्तव आज्ञा होईल तर पारपत्ये करूं. फौज आलीकडे उतरऊ. विना फौज येथें राहिल्यावांचून समीपील बुंधेल्याचें पारपत्ये होणार नाहीं. याची आज्ञा देवावी व राव राजे येथून जाते परंतु जेव्हां फौज पैलतीरीं आली तेव्हां गेले ऐसें वर्तमान आहे. सिष्टाचारी बहुत करितात, परंतु याजसारिख भले हेच आहे. यांची कोणी भरवसियावर राहील म्हणजे यानी त्याजला दबकाविलें याप्रमाणें वर्तमान आहे. तर च्यार दिवस फौज सागरींच राहूं द्यावी. भक्षावयासहि आज्ञेप्रमाणें कर्ज करून देत जातों परंतु या किरकोल बुंधेल्याचें पारपत्ये आपले पुण्येंकरून करितों याची परवानगी सत्वर लिहून पाठवावी. येथून तरकारी हरजिनसी डालिया २ पाठविल्या आहेत पावतील. बितपसील परवरे १२० दोडके १० भोपले २ तोंडाली ४४॥ साखरनिंबें पाठविलें आहे पावेल. सरसेंड्याकडे पजनसिंगानें मोठी धूम आरंभीली आहे. जमाव तों शंभर प्यादा व पंचवीस स्वार आहेत. परंतु बुंधेल्याची दहशत मोठी गावास आहे यास्तव ब्राम्हगुण्याकडे गेलिया तेहि दबावाखाले येतील. यास्तव विनंति लिहिली जाते याची आज्ञा खामखा करून पाठवावी. आणखी स्वार आम्हां नलगे. येवढी स्वारीनसी ठहरोली देखील भयाभीत होईल. आपण पुण्यवान आहे. मोठें अरिष्ट भगवंतें शम केलें, त्यावर हे गरीब काये करणार? येंदा देशच्या फौजा आल्या म्हणजे या भशागढीचे चिरगाव टहरोली याचे पारपत्य अगत्यरूप करवावे. ज्याप्रमाणें बडेगांवची गत जाली याप्रमाणें त्यांचीहि करावी हें आमचें मानस आहे. आपण पुण्यवान आहेत. आमचें मानस ईश्वर पार पाडील. यांची बुंधेल्याची मर्जी ठिकाणीं नाहीं. हे मोठे भले माणूस आहेत ! तर या पत्राचें उत्तर सत्वर पाठवावें. सेवेसीं विनंती श्रुत होये हे विज्ञप्ति.