Selections from the Peshwa Daftar 29.16: [27-10-1761] Balaji Govind informs Dadasaheb that the Gilchas have penetrated as far as Attock.
Selections from the Peshwa Daftar 29.16
- Language
- Marathi
29.16
छ २७ राख़र इसने
श्री
श्रीमंत राजश्री दादासाहेब
स्वामी साहेबांचे सेवेसी
विनंती सेवक बालाजी गोविंद कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना. येथील कुशल तागाईत छ २८ माहे रबिलावल मुकाम नेणवें स्वामी साहेबांचे कृपाकटाक्षें यथास्थित असों विशेष. इकडील वर्तमान तो पूर्वीं तपसिलेंकरून अजुरदार जोडीसमागमें विनंती केलें. आ * * जाहलें असेल. सांप्रत स्वामीकडील आज्ञापत्र छ * [पत्राचा पुढील भाग तुटला आहे. त्यानंतर पत्राचे पाठीमागील मजकूर.] * जबरदस्त आहे. यापुढे कांही पुरुषार्थ कोणाचा हि चालत नाही. गिलजीहि अटकेस पावला म्हणोन वदंता. बातमी ठीक आली नाहीं. आली म्हणजे सेवेसी विनंती केली जाईल. वरकड वर्तमान पुर्वणीवरून श्रुत होईल. बहुत काये लिहिणें ? कृपा लोभ केला पाहिजे हे विज्ञापना.
---
Discussed in (1)
- Fall of the Mughal Empire — Sarkar 1932, English